नातेपुते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर येथील एबीपी कॉलेज या ठिकाणी ९ व १० ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील १२वी कला मधील विद्यार्थी रणजीत पोपट जाधव याने ८०० मीटर व १५ मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक, ११वी कला मधील विद्यार्थी सिद्धनाथ सत्यवान जगताप याने ३००० मीटर धावणे व कॉस कंट्री मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.तसेच सौरभ तानाजी नरोटे याने ४०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. वरील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील, मार्गदर्शक तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, संचालिका उर्वशीराजे मोहिते पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. बी टी निकम, पर्यवेक्षक बी. टी. वाघमोडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील होणाऱ्या पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना प्राध्यापक पैलवान नारायण माने यांचे मार्गदर्शन मिळाले.
0 Comments