शंकरनगर येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत रुग्णांची आरोग्य तपासणी
अकलुज (कटूसत्य वृत्त):- केंद्र शासनाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या "स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानांतर्गत शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात किशोरवयीन मुली व महिलांच्या विविध आजारांची तपासणी वज्ञनिदान करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अमोल आव्हाड यांनी दिली.
यावेळी व्यास पिठावर अकलुज येथील प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. संजय सिद,रूद्रा डेंटल क्लिनिक चे दंतरोग तज्ञ डॉ. सावन पालवे, शंकरनगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बिना आर्वे,पनीव उपकेंद्र प्रमुख डॉ.चव्हाण यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दातांच्या आरोग्यावरच शरीराचे आरोग्य अवलंबून- डॉ. सावन पालवे
आपल्या शरीरात सर्वच अवयवांचे अनन्य साधारण महत्व असते.त्यापैकी च दात हा एक महत्वाचा अवयव आपल्याला निसर्गाकडुन महत्वाचा अवयव आहे.आपण इतर अवयवांप्रमाणेच दातांची काळजी घेणे गरजेचे आहे.तोंडाच्या किंवा दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी खुप हानीकारक ठरू शकते.दातांच्या आजाराकडे सुरवातीपासुनच लक्ष दिले तर भविष्यात होणारे गंभीर आजार टाळता येतात.त्यामुळे निरोगी शरीराचे रहस्य असलेल्या दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचे अवाहन अकलुज येथील रुद्रा डेंटल क्लिनिक चे डॉ. सावन पालवे यांनी यावेळी केले.
पुढे बोलताना डॉ. अमोल अव्हाड यांनी शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील गिरझणी ,पानिव,खुडुस,विझोरी,चौंडेश् वरवाडी या उपकेंद्रात महिला व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये एच.बी.कॅन्सर तपासणी, निदान,गरोदर मातांसाठी मार्गदर्शन, बि.पी.एल.सी.डी.प्रोग्राम, अस्थी रोग ,व दंतरोग तपासणी करण्यात आली.
.png)
0 Comments