माळशिरस तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व राम सातपुतेंकडेच- पालकमंत्री गोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 13, 2025

माळशिरस तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व राम सातपुतेंकडेच- पालकमंत्री गोरे

 माळशिरस तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व राम सातपुतेंकडेच- पालकमंत्री गोरे




निमगाव (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील माने पाटील परिवार हा मूळचा म्हसवड येथील असून, माण तालुक्याशी त्यांची नाळ घट्ट असून, आपल्या उद्योग व्यवसायाशी प्रामाणिक असणारे सुजयसिंह माने पाटील हे माळशिरस तालुक्यात भाजपासाठी देखील तितकेच प्रामाणिकपणे काम करीत आहेत. माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात भाजपासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या कर्तुत्ववानांकडेच माळशिरस तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व असेल असे राज्याचे ग्रामविकास, पर्यटन तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार गोरे यांनी बोलताना सांगितले.

   ते अकलूज येथे अकलूजचे भाजपा मंडळ अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील यांच्या निवासस्थानी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते यावेळी विचारपीठावर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते ,सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील ,शशिकांत उर्फ बाळासाहेब माने पाटील, हिंदुराव माने पाटील माळशिरस चे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, संजय देशमुख, महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी ,माने पाटील, माने देशमुख परिवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आगामी काळ हा निवडणुकांचा काळ असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वच निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या भाजपाला अग्रभागी ठेवण्याचे आवाहन केले. 

    माळशिरस भाजपात काही लोकांनी बंडाळीची आवई उठविल्यानंतर पालकमंत्री प्रथमच माळशिरस तालुक्यात आले होते. यावेळी माळशिरस भाजपाचे नेतृत्व कोण करणार ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर  माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे पाहत आगामी काळात निवडणुकांसाठी माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका लढवल्या जातील असे अधोरेखित केले यामुळे आगामी काळातील माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली होणार असे संकेत त्यांनी दिले यावेळी हिंदुराव माने पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक सुजयसिंह माने पाटील यांनी करून सर्वांचे स्वागत केले सूत्रसंचालन संतोष साठे तर आभार अमरसिंह माने देशमुख यांनी मानले.

*चौकट*
माने पाटील परिवाराने गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत, भाजपासाठी अहोरात्र काम केले असून माळशिरस तालुक्यात माने पाटील परिवाराकडे श्रद्धेने व निष्ठेने पाहिले जाते. आपली श्रद्धा व निष्ठा व प्रामाणिकपणा अशी ओळख असणारा माने पाटील परिवार हा भाजपाच्या स्मरणात कायमच असेल यामुळे माने पाटील परिवारासोबत राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व स्वतः राम सातपुते असतील.
माजी आमदार राम सातपुते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages