Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ शहराच्या पूर्व भागातून अनेक नवोदितांना निवडणूक लढवण्याची संधी

 मोहोळ शहराच्या पूर्व भागातून अनेक नवोदितांना निवडणूक लढवण्याची संधी




प्रभाग तीन मधून इच्छुकांची संख्या मोठी

भाग्यश्री अमोल गायकवाड यांच्या नावाचीच सर्वाधिक चर्चा
 

मोहोळ (साहील शेख):- मोहोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यापूर्वी राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या चेहऱ्यांबरोबर इतर नव्या चेहऱ्यांना देखील राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याची महत्त्वपूर्ण संधी या निवडणुकीतील आरक्षणामुळे उपलब्ध झाली आहे. मोहोळ शहराच्या पूर्वभागातील राजकारणाचा दबदबा संपूर्ण शहराच्या राजकारणावर असल्याचे आज तागायत बऱ्याचदा झाले आहे. या प्रभागातून निवडून आलेले नगरसेवकांवरच सत्ता स्थापनेचे गणित अवलंबून असते. मोहोळ शहराच्या पूर्व भागात दोन प्रभागांचा मिळून नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग तीन मध्ये यावेळी राजकीय समीकरणांना गतीने प्रारंभ झाला आहे. यापूर्वी हा प्रभाग दोन आणि चार असा स्वतंत्र असताना या दोन्ही प्रभागांनी शहराच्या नगर परिषदेचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या हे दोन्ही प्रभाग महत्त्वाचे ठरले. प्रभाग चार मधून प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे विजयी झाले तर प्रभाग दोन मधून दिवंगत नेते तथा उपनगराध्यक्ष शौकतभाई तलफदार हे विजयी झाले. आता या दोन्ही प्रभागांचा मिळून प्रभाग तीन निर्माण झाला आहे.
आता या प्रभागातून भाग्यश्री अमोल गायकवाड यांच्या नावाची चर्चा आरक्षण सोडत झाल्यापासून सुरू झाली आहे.यापूर्वी म्हणजे गेल्या सहा ते सात वर्षापासून या परिसरातील युवा नेते तथा उद्योजक अमोलबापू गायकवाड हे प्रभागातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटकांशी जनसंपर्क ठेवून आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याची भूमिका त्याचबरोबर अजातशत्रू स्वभाव वैशिष्ट्य धारण केलेल्या गायकवाड परिवाराने गेल्या अनेक वर्षापासून केवळ हा प्रभागातच नाही तर संपूर्ण शहरात नावलौकिक प्राप्त केला आहे. याशिवाय एक उच्च विद्याविभूषित आणि सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या या परिवारातील भाग्यश्री गायकवाड यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रभागातील जाणकार मंडळी कामाला लागली आहेत. 

चौकट
निवडणुकीसाठी भाग्यश्री गायकवाड या इच्छुक असून लवकरच याबाबत युवा नेते अमोल गायकवाड हे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांना मिळणारा मोठा प्रतिसाद, त्यांचा असलेला प्रभावी जनसंपर्क आणि सर्वसामान्यांची त्यांची जुळलेली नाळ या सर्व जमेच्या बाबी गृहीत धरून निश्चितपणे त्यांच्या उमेदवारीचा विचार राजकीय किंगमेकर करू शकतात. त्यांना कोणत्या राजकीय प्रवाहाकडून उमेदवारी मिळणार यापेक्षा त्यांच्या सक्षम उमेदवारीचा आणि त्यांच्या विजयाचा फायदा कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments