Hot Posts

6/recent/ticker-posts

पंजाब नॅशनल बॅकेकडून पुर ग्रस्थांना मदतीचा हात

पंजाब नॅशनल बॅकेकडून पुर ग्रस्थांना मदतीचा हात 


माढा  (कटूसत्य वृत्त):- ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील राहुल नगर येथील पूरग्रस्तांना अन्नाचे किट स्वरुपात मदत देण्यात आली. माढा शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सीना नदीच्या काठावरील राहुल नगर येथील वस्तीतील लोकांना पुराचा मोठा फटका बसला होता. निवासी घरांमध्ये पाणी शिरले, आर्थिक नुकररान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत, सामाजिक जाणीवेतून ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफिसर्स असोसिएशन पुणे यांनी निधी संकलनाचे आवाहन केले होते. बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. एकूण २०० कुटुंबांना मदत करण्यात आली. नाना, विक्रम आणि अभिजीत यांनी पीडितांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. पुणे विभागाचे अध्यक्ष विठ्ठल माने, सचिव अमोल तांबे, संतोष आढाव, सुनी नलावडे, वैभव निकम आणि वैभव चिकटे, विशाल सातव यांच्या मार्गदर्शनात अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments