Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी विद्यार्थ्यांचा शाळेसाठी आदर्श उपक्रम श्रमदान, वृक्षारोपण आणि लोकवर्गणीचा अनोखा संगम

 माजी विद्यार्थ्यांचा शाळेसाठी आदर्श उपक्रम श्रमदान, वृक्षारोपण आणि लोकवर्गणीचा अनोखा संगम




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-टेंभुर्णी (ता. माढा) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत  पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी नगर (टेंभुर्णी) येथील माजी विद्यार्थ्यांनी एक आदर्श उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात श्रमदान आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. स्वच्छतेसोबतच परिसर सुशोभित करण्याचा हेतू साध्य करत माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांपैकी सरपंच सुरजा बोबडे यांनी 25 हजार, सौ.स्वरालीताई बोबडे यांनी 33 हजार,जॉकी सुर्वे यांनी 15 हजार, विनोद शिंदे यांनी 21 हजार, जयप्रकाश ननवरे यांनी 23 हजार 111 रुपये इ. व्यक्तींनी लोकवर्गणी दिली यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आवश्यक असणाऱ्या सुविधा उभारण्यासाठी एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची लोकवर्गणी जमा करून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये हरित आणि स्वच्छतेबद्दल सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ.सुरजा बोबडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.योगेश बोबडे तसेच ग्रामपंचायत सदस्य, शाळा नियोजन समितीचे अध्यक्ष सौ. स्वरूपाताई बोबडे, केंद्रप्रमुख संतोष वरकुटे सर,उजनीनगर शाळेचे मुख्याध्यापक सुभाष रोडगे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जॉकी सुर्वे, उपाध्यक्ष जयप्रकाश ननवरे, शिक्षण प्रेमी स्वरालीताई बोबडे, तसेच माजी विद्यार्थी निलेश मुसळे, संग्राम देशमुख, विनोद शिंदे तसेच इतर शाळेतील शिक्षक व नागरिक उपस्थित होते.शाळेतील शिक्षकवृंद, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले असून, हा उपक्रम इतर शाळांसाठी आणि ग्रामस्तरावरील संस्थांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments