कसलाही डाम डौल थाट माट न करता, निवारा केद्रात पुरबाधितांशी संवाद
माढा (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हातील ४५२१ नागरिकांना पुराच्या पाण्यातुन बाहेर काढले आहे.८८ गावे पुरामुळे बाधीत झाली होती.कुणाचाही पाण्यात अडकल्यामुळे पुरामुळे मृत्यु झालेला नाही.१७ टिमद्वारे बचाव केले असून बचाव कार्य आता संपले आहे.कोळेगाव धरणाचा विसर्ग फार कमी झाला आहे.५२ हजार इतका विसर्ग झाला आहे.
सोलापूर जिल्हातील पुरस्थिती पुर्ण ओसरली आहे.आता पूर येणार नाही.एवढा पूर या पुर्वी कधीच आला नव्हता.मात्र कसलाही धोका जिल्हावासियांना राहिलेला नाही. असे मत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी व्यक्त केले.
चिंचगाव ता.माढा या ठिकाणी असलेल्या निवारा केंद्राला जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम,प्रांताधिकारी जयश्री आव्हाड,तहसीलदार संजय भोसले यांच्यासमवेत भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी पुर बाधित नागरिकांशी संवाद साधला.तद्नंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.
पुर्ण सोलापूर जिल्हातील पुर बाधित गावांमध्ये स्वच्छता मोहिम लवकरच राबवली जाणार आहे.रेशनचे अन्नधान्य गावोगावी पोहचले आहे.शेतकर्याच्या जनावरांना चारा ही पोहच करण्याचे काम सर्व गतीने सुरु आहे.सगळ्या लोकांनी मिळुन काम केलंय.सर्व सामान्य व्यक्ति ते आमदार खासदार मंत्री-तहसीलदार-प्रांत तलाठी पोलिस या सगळ्याच लोकांसाठी अहोरात्र काम केले आहे.
ज्याचे घरे पुरात वाहून गेली आहेत.त्यांच्या पुनर्वसनासाठी ऑक्टोबर अखेरीला कायदे नियम पाहून मदत केली जाईल.ज्याचे घराचे नुकसान झाले आहे.अश्या नागरिकांना उद्यापासून १० हजारांची मदत खात्यावर जमा केली जाणार.आता घराचे पंचनामे झाले- शेतीचे पंचनामे उद्यापासून केले जाणार आहेत.
मांडी घालून खाली बसून पुरबाधित नागरिकांशी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.
चौकट) अधिकारी आले होते का मदतीला -कलेक्टराचा सवाल-नागरिक म्हणाले होय देवदुतासारखे आले धावून =
अधिकारी आले होते का मदतीला असा कलेक्टरानी सवाल करताच प्रांताधिकारी जयश्री आव्हाड-तहसीलदार संजय भोसले यांचेसह त्यांच्या टिमने ग्राऊंड वर उतरुन आम्हाला देवदूतासारखे धावून आले.त्यांनी सर्वतोपरी मदत केली अश्या भावना पुर बांधित नागरिकांनी मांडल्या.
चौकट] शिवसेनेच्या प्रवक्त्या-ज्योती वाघमारे- यांच्या व्हायरल अॅडियो काॅल प्रश्नी-जिल्हाधिकारी आशिर्वाद यांना विचारणा केली असता ते म्हणाले-
ही वेळ मदत करण्याची आहे.तिन चार दिवस बचाव कार्यात आम्ही व्यस्त होतो.त्या काळात जेवण पूरवठा करणे शक्य नसताना आम्ही केला.पाकणी मध्ये आम्ही ६०० ते ७०० पॅकेट देत होतो-उर्वरित साठी सगळ्यांनी मदत केली तर हे शक्य होऊ शकते.असे माझे मत होते.पाकणी मध्ये ३ हजार कीट देणं शक्य नव्हते.कारण त्यावेळी जिल्हा मध्ये जवळपास ७५ ते ८० हजार लोक बाधित होते.दोन दिवसात सिस्टम उभा करणे शक्य नव्हते.आता २७ ते २८ तारखेला मी जेवण पूरवठा करु शकलो.
.jpg)
0 Comments