सोलापूरात अतिवृष्टीमुळे 478 ग्रामीण रस्त्यांची मोठी हानी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अतिवृष्टी व पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील ४७८ रस्त्यांची मोठी हानी झाली असल्याचे दिसून आले आहे. या रस्त्याच्या तात्पुरत्या स्वरुपाच्या दुरुस्तीसाठी ६१ कोटी तर कायमस्वरुपी कामांसाठी २१० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे .
पुरामुळे अक्कलकोट तालुक्यातील ३९ रस्त्यांची हानी झाली आहे. या रस्त्यांच्या तात्पुरती दुरुस्तीसाठी ५ कोटी ३१ लाख तर कायमस्वरुपी कामासाठी १७ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. बार्शी तालुक्यातील १०२ रस्त्यांची हानी झाली आहे. या रस्त्यांच्या तात्पुरती दुरुस्तीसाठी १२ कोटी ७० लाख तर कायमस्वरुपी कामासाठी २५ कोटी ५० लाखांच्या निधीची गरज आहे.
माढा तालुक्यातील ४३ रस्त्यांची हानी झाली आहे. या रस्त्यांच्या तात्पुरती दुरुस्तीसाठी ३ कोटी २० लाख तर कायमस्वरुपी कामांसाठी ९ कोटी निधीची गरज निर्माण झाली आहे. मोहोळ तालुक्यातील ८५ रस्त्यांची हानी झाली आहे. या रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी ३६ लाख तर कायमस्वरुपी कामासाठी ३३ कोटी १८ लाखांच्या निधीची गरज निर्माण झाली आहे. उत्तर सोलापुर तालुक्यातील २७ रस्त्यांची हानी झाली आहे. तात्पुरती दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील १८ रस्त्यांची हानी झाली आहे. यासाठी तात्पुरती दुरुस्तीसाठी १ कोटी १० लाख तर कायमस्वरुपी कामांसाठी १२ कोटी १५ लाखांच्या निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे. करमाळा तालुक्यातील ४२ रस्त्यांची हानी झाली आहे. यात तात्पुरती दुरुस्तीसाठी ९ कोटी ४२ लाख तर कायमस्वरुपी कामांसाठी २० कोटी २६ लाखांच्या निधीची गरज निर्माण झाली आहे.
माळशिरस तालुक्यातील १४ रस्त्यांची हानी झाली आहे. यात तात्पुरती दुरुस्तीसाठी २ कोटी तर कायमस्वरुपी कामांसाठी ५ कोटी ९५ लाखांच्या निधीची गरज निर्माण झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ३१ रस्त्यांची हानी झाली आहे. या रस्त्यांच्या तात्पुरती दुरुस्तीसाठी १ कोटी ९९ लाख तर कायमस्वरुपी कामांसाठी ४३ कोटी १५ लाखांच्या निधीची गरज निर्माण झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील ३५ रस्त्यांची हानी झाली आहे. या रस्त्यांच्या तात्पुरती दुरुस्तीसाठी ५ कोटी ७७लाख तर कायमस्वरुपी कामासाठी २५ कोटी ७५ लाखांच्या निधीची गरज निर्माण झाली आहे. सांगोला तालुक्यातील ४२ रस्त्यांची हानी झाली आहे. या रस्त्यांच्या तात्पुरती दुरुस्तीसाठी ८ कोटी २५ लाख तर कायमस्वरुपी कामांसाठी १८ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
रस्त्यांच्या संख्येत आणखीन वाढ होणार
पूर व अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या रस्त्यांची पाहणी बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. काही रस्त्यांवर अजूनही पाणी असल्याने या रस्त्यांचे मूल्यांकन करण्यात आले नाही. त्यामुळे हानी झालेल्या रस्त्यांच्या संख्येत आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती जि.प.बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
0 Comments