आंदोलनस्थळी भोजनसेवा
शहर-जिल्ह्यातील विविध संघटनांकडून मदतीचा ओघ
सोलापूर : (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोलापुरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.. आंदोलनकर्त्यांची उपासमार होऊ नये, म्हणून सोलापूर शहरातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, तयार अन्नाचे पाकीट, कडक भाकरी, शेंगाचटणी, ठेचा, पाणी बॉटलचे बॉक्स असे साहित्य पाठवत जेवणाची सोय केली आहे.
मुंबईत धरणे आंदोलनावर बसलेल्या मराठा आंदोलकांसाठी सोलापुरातून जेवण, नाश्ता व पाण्याची
सोय केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते, मंडळे आणि तरुणांनी मिळून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. आंदोलनकर्त्यांना घरगुती अन्न मिळावे, त्यांचा उत्साह वाढावा, यासाठी मोठ्या संख्येने योगदान दिले जात आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीतून साथ देण्याचा निर्धार मुंबईला पाठवली जात आहे. व्यक्त करत मोठ्या प्रमाणात मदत मुंबईतील आरक्षण आंदोलनाला
पाठिंबा देत नवशा गणपती सेवा मंडळ ट्रस्टवतीने साहित्य पाठविले. यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, राजन जाधव, बाळासाहेब भोसले, आशिष इंगळे- देशमुख, प्रतापसिंह गोरे-पाटील, संदीप दळवे-पाटील, जयंत इंगळे-देशमुख आदी उपस्थित होते. सोमवारी पहाटे हे साहित्य मुंबईकडे रवाना झाले आहे.
चौकट १
खा. प्रणिती शिंदेंकडून जेवणाची व्यवस्था
खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरची प्रसिद्ध दहा हजार कडक भाकरी, पिठले, शेंगाची चटणी, लोणचे आणि सोलापूरची बान-खारबेळळी असे जेवणाचे साहित्य तयार करून मुंबईतील आंदोलनस्थळी पाठवण्यात आले. माजी नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, श्रीरंग लाळे, सचिन गुंड, पंडित धवन यांनी आंदोलनस्थळी भोजनाचे साहित्य वाटप केले.
चौकट २
एमआयएमची मदत
मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी जमलेल्या मराठा बांधवांना एमआयएम पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी शाब्दी व त्यांच्या टीमकडून जीवनावश्यक वस्तू, पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था केली व आंदोलनास पाठिंबा दिला.
0 Comments