हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणारे झुंजार गणेश मंडळ= पो.नी. नारायण पवार.
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- झुंजार तरुण गणेश मंडळ भोसले वस्ती या मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त संकष्ट चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते गणरायाची आरती करून झुंजार गणेश मंडळाचे अध्यक्ष आमिर काझी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक पवार म्हणाले की हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारे हे मंडळ असून या मंडळाचा आदर्श घेण्यासारखा आहे कारण या मंडळाचे अध्यक्ष एक मुस्लिम युवक असून सर्वांनी या मंडळाचा आदर्श घ्यावा या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम युवक एकत्रित वावरत असल्याने सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले. व मंडळाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी. चव्हाणवाडीचे सरपंच हनुमंत चव्हाण, चेअरमन नरहरी नांगरे, सरपंच नवनाथ शिंदे, चेअरमन कैलास चव्हाण, चेअरमन राहुल चव्हाण, सौदागर भोसले, कोल्ड स्टोरेज नागेश माळी, मंडळाचे अध्यक्ष आमिर काझी, उपाध्यक्ष नागेश गायकवाड, मिरवणूक प्रमुख गोविंद जगताप, पत्रकार धनंजय भोसले, बाळासाहेब चव्हाण, आसिफ काझी, भारत जगताप, शरीफ काझी, सुनील भोसले, गणेश पवार, देविदास भोसले, विशाल भोसले, अतुल भोसले, सुरज काझी, जावेद काझी, कुदरत काझी, स्वप्निल चव्हाण, गणेश मिस्कीन, मोनू काझी, बालाजी पाडुळे, अजित पाडुळे, सागर भोसले, अक्षय भोसले, रोहन वाघमारे, स्वप्निल भोसले, सतीश जगताप, बाळासाहेब जगताप, गजानन कांबळे,रमजान काझी,आसिफ काझी, जहांगीर काझी, संजय चव्हाण, यशराज भोसले व राजमुद्रा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments