टेंभुर्णी लोकनाट्य कला केंद्रा बाहेर गोळीबारात प्रकरणी तीघांना 15 तारखे पर्यंत पोलीस कोठडी
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- लोकनाट्य कला केंद्रात नृत्यांगणांची बैठक लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर गावठी बंदुकीने पायावर गोळी झाडून एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.९) मध्यरात्री रात्री घडली असून या गोळीबारात वाखरी (ता. पंढरपूर) येथील देवा बाळु कोठावळे (वय २७, व्यवसाय लॉज) गंभीर जखमी होऊन डाव्या मांडीत गोळी घुसली असल्याने
याप्रकरणी 1) सोन्या उर्फ अविष्कार किशोर शिंदे वय 28 राहणार नवीन सोलापूर रोड, कॉलेज समोर पंढरपूर
2) अभिषेक दादासाहेब इंगळे व 29 राहणार शेगाव धुमाल तालुका पंढरपूर हल्ली राहणार. रामबाग पंढरपू
3) अंबानी उर्फ सुरज दत्तात्रय पवार वय 23 राहणार कोर्टी तालुका पंढरपूर
यांना टेंभुर्णी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पी एस आय कुलदीप सोनटक्के व चार पोलिस कर्मचारी यांची टिम तयार करून घटणा घडल्या पासून 24 तासाच्या आत चार आरोपी पैकी वरील संशयित तीन आऱोपींना अटक करण्यास टेंभुर्णी पोलीसांना यश आले असून चौथा आरोपी महाराज उर्फ ज्ञानेश्वर पांडुरंग कडलास्कर राहणार व्यास नारायण झोपडपट्टी अंबाबाई पटांगण पंढरपूर हा फरार असून त्याला ही लवकरच ताब्यात घेण्यासाठी आमची टिम प्रयत्न करीत असल्याचे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले तसेच वरील आरोपी वरती मोठे पंढरपूर शहर व तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आज माढा ज्ञायालया समोर उभे केले असता न्यायाधिश कुलकर्णी यांनी तीघांना ही पंधरा तारखे पर्यंत पोलीस कोठडी दिली असून सरकारी वकील पक्षा तर्फे ॲड कोकणे तर आरोपी तर्फे .
ॲड सिताफळ यांनी काम पाहिले.

0 Comments