शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी – राजू शेट्टी
पुणे (कटूसत्य वृत्त) :- महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १११ टक्के पाऊस पडला असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून ओला दुष्काळ जाहीर करण्यास हा पुरावा पुरेसा आहे. यासाठी स्वतंत्र पुराव्याची गरज नाही. त्यामुळे ज्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी बँका आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे, ते कर्ज सरकारने माफ करावे, अशी ठाम मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.
माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले की, “राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र सरकार बिहार, पंजाबला तत्काळ मदत करते, मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत दुर्लक्ष का केले जाते? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राला अधिक आर्थिक उद्ध्वस्त होताना बघू इच्छितात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेट्टी पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राला गृहित धरू नका. राज्यातील शेतकरी संकटात सापडले असून तातडीने कर्जमुक्तीची घोषणा झाली पाहिजे. अन्यथा आत्महत्येचे प्रमाण वाढेल.”शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीला आता वेग मिळत असून, सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी जनतेचीही अपेक्षा आहे.
0 Comments