Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत १२८६ रुग्णांनी घेतला उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे आरोग्य शिबीराचा लाभ

 स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत १२८६ रुग्णांनी घेतला उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे आरोग्य शिबीराचा लाभ






पंढरपुर  (कटूसत्य वृत्त):-  भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधी दरम्यान स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविले जाणार आहे.

याचाच एक भाग म्हणुन उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये अस्थीरोग, मानसिक विकार दंतचिकित्सा, हृदयरोग, सोनोग्राफी, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग, कर्करोग, अस्थिरोग कान नाक घसा तपासणी विविध आजारावरील शस्त्रक्रियापुर्व तपासणी करीता खासगी तसेच शासकीय विशेषज्ञ यांनी सेवा बजावली.

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी व्हर्चञ्जुल फीत कापुन स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उदघाटन केले तसेच देशातील सर्व रुग्णालयांना ऑनलाईन संबोधित करताना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे आरोग्य शिबीराच्या उदघाटन प्रसंगी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  सोमनाथ आवताडे, पंढरपुरातील प्रसिध्द बालरोग तज्ञ व पेडियाटीक असोसिएशन पंढरपुरचे अध्यक्ष डॉ. शीतल शहा, फेडेरेशन ऑफ गायनॅकॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुदेश दोशी, उपजिल्हा रुग्णालय पंढरपुरचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. दिपक धोत्रे, आरोग्य शिबीराच्या नोडल अधिकारी डॉ. सीमा इंगोले, सहा. अधिसेविका  सिंधुताई लवटे परिसेविका एम. एम. कुलकर्णी,  अनुराधा जाधव,  छाया नाडगौडा व इतर सर्व रुग्णालयीन स्टाफ, पंढरपुरचे माजी नगराध्यक्ष  लक्ष्मण शिरसट, भारतीय जनता पार्टी पंढरपुर शहर अध्यक्ष  रोहित (लाला) पानकर, माजी नगरसेवक श्री. विक्रम शिरसट, रुग्ण कल्याण समिती उपजिल्हा रुग्णालय पंढरपुरचे सदस्य  शंकर सुरवसे यावेळी  भाऊ टमटम, यल्लापा कबाडे, वैभव फसलकर, बबन येळे, शैलेश आगावणे, उपस्थित होते.

आरोग्य शिबीरात आज एकुण २४ शस्त्रक्रिया पार पडल्या सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक तथा जनरल सर्जन डॉ. अरविंद गिराम यांनी लहान बालकांच्या चिटकलेली जीभेच्या ४ शस्त्रक्रिया केल्या तसेच एका लहान मुलाची हायड्रोसीलची शस्त्रक्रिया करण्यात आली. फिरते नेत्रपथकाच्या डॉ. चाकणे यांनी १७ रुग्णांच्या मोतिबिंदु शस्त्रक्रिया केल्या.

पोषण आहार माह निमीत्त उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे भव्य आहार प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये कडधान्य, सकस आहार, लोहयुक्त आहार याविषयी जनजागृती करणारे स्टॉल उभारण्यात आले होते यासाठी आहारतज्ञ  अनुराधा वाघमारे,  अमृता इनामदार यांनी परिश्रम घेतले. सदरचे शिबीरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारीका, पॅरामेडीकल स्टाफ, वर्ग-४ कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले


Reactions

Post a Comment

0 Comments