Hot Posts

6/recent/ticker-posts

तलाठी असो की कलेक्टर'. कोणी किती काम केले, आता तपासणार

 तलाठी असो की कलेक्टर'. कोणी किती काम केले, आता तपासणार





मुबंई (कटूसत्य वृत्त):-  महसूल विभागाच्या ऑनलाईन कामकाजावर सतत लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. यातून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचा आढावा मिळणार आहे. राज्य सरकारचे हे महत्वाकांक्षी पाऊल ठरणार आहे. डिजिटल डॅशबोर्ड माध्यमातुन जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते गावापातळीवरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचेच कामकाज दिसणार आहे. महसूल विभागाच्या विविध सेवा तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
     या निर्णयामुळे आता जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी, लिपिक अशा सर्व पदांवरील अधिकारी - कर्मचाऱ्यांचे कामकाज थेट शासनाच्या रडारवर राहणार आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढणार आहे.

दप्तरी तपासणी म्हणजे काय?
दप्तरी तपासणी म्हणजे महसूल कार्यालयात विविध प्रकरणाचा तपास, प्रकरणे किती निपटली आणि किती प्रलंबित आहेत. हे पाहण्याची पद्धत आहे, यामुळे कामाचा वेग आणि दर्जा कसा आहे ते समजले.

डॅशबोर्डवर सर्व माहिती उपलब्ध होणार

या नव्या प्रणालीमुळे दप्तरी तपासणीबद्दल एक क्कीलकवर डॅशबोर्डवर माहिती उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी कोणत्या अधिकऱ्यांने किती काम केले याची माहिती मिळेल यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना कामकाजाची गती काय आहे हे तपासता येईल. कामकाजात दिंरगाई झाल्यास कारणे कळतील. फाईल प्रलंबित का आहे, याची स्पष्टीकरणही मिळणार आहे.
दिरंगाई आणि बेफिकीरीवर बसणार चाप 
महसूल विभागाच्या ऑनलाईन कामकाजामुळे दिरंगाई टळणार.
अधिकाऱ्यांनी किती काम प्रलंबित ठेवले आहे, हे कळणार आहे.
नागरिकांना सेवा वेळेत मिळण्यासाठी मदत होणार.

संगणकीकरणानंतर वाढला होता गोंधळ

संगणकीकरणानंतर महसूल विभागाच्या कामकाजात गोंधळ वाढला होता, मात्र यामुळे कामकाजाचा वेग वाढेल असे महसूल विभागाचे म्हणणे आहे, विविध पातळयावंर कामाचा आढाव घेता येणार, असल्याने तक्रारी कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवी प्रणाली सर्वांना बंधनकारक ठरणार.

या नव्याप्रणालीमुळे तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचेही कामकाज तपासले जाणार आहे. त्यामुळे कुणीही निष्क्रिय राहणार नाही.
Reactions

Post a Comment

0 Comments