Hot Posts

6/recent/ticker-posts

चिमुकल्या अभिनव च्या वाढदिवसानिमित्त एकलव्य आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना भोजन

 चिमुकल्या अभिनव च्या वाढदिवसानिमित्त एकलव्य आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना भोजन






करमाळा  (कटूसत्य वृत्त):- सामाजिक बांधिलकी जपत चिमुकल्या अभिनवचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा येथील निवासी विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.

या उपक्रमात शाळेतील तब्बल १३५ विद्यार्थ्यांना स्वादिष्ट जेवणाचे वाटप करण्यात आले. अभिनवचा वाढदिवस साजरा करण्याचा आनंद लहान मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. या प्रसंगी कांबळे कुटुंबीय तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.

“वाढदिवस हा फक्त केक कापून साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक दृष्टिकोनातून मुलांना आनंद देणे ही खरोखरच प्रेरणादायी बाब आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

 या प्रसंगी एकलव्य प्राथमिक आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण (भाऊ) माने यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणासोबतच अशा सामाजिक कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते व त्यांच्यात सेवाभावाची प्रेरणा निर्माण होते.”

या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले. शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. सामाजिक एकोपा आणि सेवाभाव जपणाऱ्या या उपक्रमामुळे शाळेचे वातावरण उत्साहवर्धक झाले.

अभिनवच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजासाठी आदर्श ठरेल, असेही मत व्यक्त करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments