Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोल्यात नवरात्रोत्सव काळात दांडिया गरबा नाईट-२०२५ चे आयोजन

 सांगोल्यात नवरात्रोत्सव काळात दांडिया गरबा नाईट-२०२५ चे आयोजन



 


सांगोला (कटूसत्य वृत्त):- छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर, सांगोला व जोतिर्लिंग प्रतिष्ठान संचलित, जोतिर्लिंग प्रतिष्ठान यांच्या वतीने दांडिया गरबा नाईट-२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, तर सोनिया जयकुमार गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान सायं. ५ ते रात्री १० पर्यंत चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत मित्रपरिवार सांगोला तालुका यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. 
    दांडिया गरबा नाईट-२०२५ या कार्यक्रमात प्रथम दिवस लकी ड्रॉ ७ पैठणी साड्या माजी नगरसेवक  आनंदा (भाऊ) माने यांच्यावतीने, दुसरा दिवस लकी ड्रॉ 7 पैठणी साड्या सौजन्य उत्तम गायकवाड, योगेश भगत यांच्या वतीने, तिसरा दिवस लकी ड्रॉ ७ पैठणी साड्या सौजन्य तनु थोरात मेकअप स्टु‌डिओ आणि रेन्टल हाऊस यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. 
       सर्वोत्कृष्ट दांडिया जोडी रु. ७००१/- व ट्रॉफी प्रताप (बाबासाहेब) देशमुख (नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांच्या वतीने, सर्वोत्कृष्ट गरबा जोडी रु. ७००१/- व ट्रॉफी किशोर कृष्णा म्हमाणे (संपादक, दै. किर्णोदय सांगोला) यांच्या वतीने, सर्वोत्कृष्ट महिला दांडिया ग्रुप रु. ७००१/- व ट्रॉफी सुयोग दिवटे (लझीज पिझ्झा) यांच्या वतीने, सर्वोत्कृष्ट महिला गरबा ग्रुप रु. ७००१/- व ट्रॉफी स्वातीताई मगर (मा. उपनगराध्यक्ष) यांच्या वतीने, सर्वोत्कृष्ट वेशभुषा रु. ७००१/- व ट्रॉफी एस. के. टेक्स्टाईल होलसेल साडी डेपो यांच्या वतीने, सर्वोत्कृष्ट मुली दांडिया ग्रुप रु. ७००१/- व ट्रॉफी आय लव सांगोला (अभिराज मार्केटींग टीम) यांच्या वतीने, सर्वोत्कृष्ट मुली गरबा ग्रुप रु. ७००१/- व ट्रॉफी नवनाथ केदार (हॉटेल संगम कमलापूर ता. सांगोला) यांच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार आहेत. ट्रॉफी एस एस ट्रॅव्हल्स यांच्या वतीने देण्यात येणार आहे. माडगुळकर ज्वेलर्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 
      या कार्यक्रमासाठी जोतिलिंग फ्रूट सप्लायर्स & ट्रान्सपोर्टस्, श्रीनाथ स्टोन क्रेशर & ज्योतीस्मती क्रिएशन्स, महालक्ष्मी कलर जंबो झेरॉक्स, नाथबाबा मंगल भांडार & केटरर्स नाथबाबा डेकोरेटर्स, अनघादत्त इंजिनिअर्स & डेव्हलपर्स सांगोला, आनंद मंडप, सांगोला, हॉटेल गोल्डन लिफ वाढेगाव नाका, सांगोला, अफजल शेख पुणे, नितीन सावंत साहेब, वाढेगांव यांचे सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी सौ. सुजाता केदार-सावंत 8888881010,  माधुरी जाधव 9689716801, ज्योती महांकाळ 9604604145, स्वाती मगर 9404666502, राणी पवार 9604611158, तनु थोरात मिसाळ 9096889429, रतन मोहिते 7620123254, शोभा देशमुख 9960156696, योगिता शिंदे 9404280003 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहयोगाने केले आहे. सदरचा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल ग्राऊंड, सांगोला येथे २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान वेळ सायं. ५ ते रात्री १० पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. सदरचा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असून सांगोला तालुक्यातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

चौकट 
या कार्यक्रमासाठी सिंगर संजू राठोड, बिग बॉस फेम जानवी किल्लेकर, सिनेअभिनेत्री अभिज्ञा भावे, सेलिब्रिटी अँकर आर जे अक्षय, प्रसिद्ध रिल्स स्टार वैभव गावडे, मिस ग्लॅमर ऑफ महाराष्ट्र समृद्धी खडतरे, ऑपरेटर डीजे गणेश, निवेदक चंद्रकांत कोकाटे, निवेदिका माधुरी जाधव उपस्थित राहणार आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments