श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून नवरात्र महोत्सवानिमित्त 'मृत्युंजय' सजीव हलता देखावा
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदाही श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५ चे आयोजन करण्यात आले असून, सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मृत्युंजय सजीव हलता देखावा उद्घाटन सोहळा आमदार सचिन कल्याणशट्टी यांच्या व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेस न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे आदिजनं उपस्थित होते.
दरम्यान श्री तुळजाभवानी माता मंदिरात महापूजा, आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हा विरक्त मठ अक्कलकोटचे श्री म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित मोहन पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे प.पु.वे.शा.स. अण्णू पुजारी व प.पु. धनंजय महाराज पुजारी, यांच्या दिव्य सानिध्यात तर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, हृदयरोग तज्ञ डॉ. सत्यशाम तोष्णीवाल, न्यासाचे कायदेविषयक सल्लागार व जेष्ठ विधीज्ञ अॅड. नितीन हबीब, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, न्यासाचे सनदी लेखापाल ओंकारेश्वर उटगे, न्यासाचे कायदेविषयक सल्लागार व विधीज्ञ अॅड. संतोष खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदरचा कार्यक्रम हा अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमास समस्त विश्वस्त मंडळ, क्रियाशील सदस्य, कार्यकर्ते, व सेवेकरी अन्नछत्र मंडळ, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था, अमोलराजे भोसले मित्र मंडळ, यांचे सहकार्य लाभणार आहे.
सदर देखावा हा घटस्थापने पासून ते विजयादशमी पर्यंत सर्व देवी भक्त व शहर वाशीयांसाठी असणार आहे. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावेत असे आवाहन संस्थेचे सचिव शामराव मोरे यांनी केले आहेत.
0 Comments