व्हॉलीबॉल स्पर्धेत एमआयटी ज्युनिअर कॉलेजचे यश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. नरसिंह विद्यालय, पाकणी येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या आणि १७ वर्षाखालील मुलांच्या विजेतेपद पटकावले. तसेच १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत द्वितीय क्रमांक मिळवला.
१९ वर्षाखालील मुलींचा संघ विजयी संघ - कर्णधार श्रुतिका वीरपे, गौरी सुर्वे, राजनंदिनी घडमोडे, श्रुति कदम, श्रद्धा जाधव, अंजली पाटील, देवीयानी यादव, साक्षी राठोड, श्रावणी कोकाटे, अदिती शिंदे, गायत्री कवाडे व दिव्या पवार.
१७ वर्षाखालील मुलांचा संघ विजेता संघ - कर्णधार श्रेयश सातपुते , अंगद भगत, समर्थ तांदळे, वेदांत खमीतकर, आर्यन कोकणे, समर्थ देशमुख, रमण गुंडेटी, कौस्तुभ चौगुले व ओम भोसले.
दोन्ही संघांनी सांघिक कौशल्याच्या जोरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले. या यशाबद्दल एमआयटी संस्थेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राजकुमार गायकवाड व क्रीडा शिक्षिका सीमा मादगुंडी यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments