Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रतिभा पांडव यांना जिल्हास्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर

 प्रतिभा पांडव यांना जिल्हास्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सद्संकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर संचलित *मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगांव  येथील सांस्कृतिक विभाग प्रमुख,आदर्श व कृतीशील सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा ज्योतीराम पांडव यांना महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, सदसंकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव, संस्थापक बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे . हा पुरस्कार 28 सप्टेंबर 2025 रोजी, ठीक दहा वाजता शिवस्मारक सभागृह सोलापूर , येथे प्रदान करण्यात येणार आहे.
              . प्रतिभा पांडव या इंग्रजी विषयाच्या आदर्श व कृतिशील शिक्षिका म्हणून गेली 16 वर्षे अध्यापनाचे काम करत आहेत त्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय चार पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत या त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला त्यांचे सदसंकल्प समूहाचे संस्थापक सचिव समाज भूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी अभिनंदन केले तसेच सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments