माढयातील शिबिरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या 51 नेत्ररुग्णांना निरोप
माढा (कटूसत्य वृत्त):- माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने वेळोवेळी रक्तदान शिबीरे, वृक्षारोपण,नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत विवाह सोहळे,जेष्ठ नागरिकांसाठी काशी यात्रा, प्रबोधनपर प्रवचन व व्याख्यानमाला,पूरग्रस्त व कोरोनाग्रस्तांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.हे सर्व विधायक व रचनात्मक उपक्रम अखंड व अविरतपणे चालू ठेवणे हीच आमची ईच्छाशक्ती असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी केले आहे.
ते माढा येथे माढेश्वरी अर्बन बँक व संकल्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नेत्र शिबिराच्या समारोपाच्या वेळी बोलत होते.
यावेळी माढेश्वरी बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले की,माढा येथे बँकेचे चेअरमन माजी आ. बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 16 वर्षांपासून नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जात आहे.यावर्षी 364 जणांची मोफत नेत्र तपासणी केली त्यापैकी मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या 101 पैकी पहिल्या टप्प्यात 51 रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.आजतागायत 7800 हून अधिक रुग्णांना नव्याने दृष्टी देण्याचे विधायक कार्य केले आहे.
सूत्रसंचालन आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.आभार बँकेचे संचालक गणेश काशीद यांनी मानले.
यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील,नेत्र शल्यचिकित्सक डॉ.गणेश इंदूरकर,वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास मेमाने,डॉ.सुयोग बुरगुटे,डॉ.अनिल बांगर,गणेश काशीद,निलेश कुलकर्णी, अशोक कावडे,सज्जनराव जाधव,रमाकांत कुलकर्णी, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, बाळासाहेब चव्हाण,धनंजय शहाणे,अनिकेत चवरे,नेताजी कापसे,मदन देशमुख,श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थ, नेत्ररुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments