Hot Posts

6/recent/ticker-posts

शंकरराव मोहिते महाविद्यालयात अभिरूप निवडणूकीचे आयोजन

 शंकरराव मोहिते महाविद्यालयात अभिरूप निवडणूकीचे आयोजन

 



अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज बी. ए. भाग एक या वर्गात अभ्यासक्रमावर आधारित अभिरूप निवडणूक शनिवार दिनांक २०. ०९.२५ रोजी घेण्यात आली. 
   शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सयाजीराजे मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात,त्याच धरतीवर बी ए भाग एकच्या अभ्यासक्रमावर अधारीत अभिरूप निवडणूक प्रक्रिया आयोजित करण्यात आली. 
   या  अभिरूप  निवडणूकीत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. 
  सुरवातीला मतदार यादी तयार करण्यापासून ते विजयी जास्त मते पडलेल्या उमेदवारास विजयी घोषित प्रमाणपत्र देईपर्यत सर्व प्रक्रिया करण्यात आली. 
  यासाठी मतदान केंद्र : शंकरराव मोहिते महाविद्यालय बी विंग खोली क्रमांक १ 
मतदान वेळ : सकाळी ८. ५० ते सकाळी ९.५० ठेवण्यात आली होती. 
या निवडणुकीत एकूण सहा उमेदवार उभे राहिले होते. 
  अभिरूप निवडणूक प्रक्रिया हा अभूतपूर्व व अभिनव उपक्रमात विदयार्थ्यांना संपुर्ण निवडणुन प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता आली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा शिवप्रसाद टिळेकर यांचे सहकार्य लागले. 
  संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॅा विश्वनाथ आवड यांचेसह बी ए भाग एकच्या विद्यार्थ्यांनी पार पाडली.

Reactions

Post a Comment

0 Comments