Hot Posts

6/recent/ticker-posts

'उत्सव लोकगितांचा' कार्यक्रमाने अक्कलकोटकरांची सांज अविस्मरणीय ठरली

 'उत्सव लोकगितांचा' कार्यक्रमाने अक्कलकोटकरांची सांज अविस्मरणीय ठरली


अक्कलकोट  (कटूसत्य वृत्त):-   निर्माते व निवेदक स्वप्निल रास्ते यांच्या 'उत्सव लोकगितांचा' कार्यक्रमात गायक कलाकार सुजित सोमण, वेदिका दामले, अमिता घुगरी यांनी सादर केलेल्या
रसीक श्रोत्यांच्या ओठावरील गीतांनी अक्कलकोटकरांची सांज अविस्मरणीय ठरली.
विवेकानंद प्रतिष्ठान अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत वे पुष्प लोक गीतांच्या कार्यक्रमाने आले. प्रारंभी दिप प्रज्वलन ५ व प्रतिमा पूजन संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी, प्रा. भिमराव साठे, मुकुंद पतकी, बसवराज शास्त्री- तिर्थ, राचप्पा वागदरे, मनोहर चव्हाण, ओमप्रकाश तळेकर आदींच्या हस्ते करण्यात आले. निवेदक
स्वप्निल रास्ते व सहकारी यांचा सत्कार संचालक मल्लीनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिवशरण जोजन, अशोक येणगुरे, मल्लिकार्जुन आळगी, अमोल कोकाटे, मलकप्पा भरमशेट्टी, चंद्रकांत दसले, दयानंद परिचारक, सिद्धाराम मसुती, महेश कापसे, निलकंठ कापसे, मल्लीनाथ मसुती, गुरुपादप्पा आळगी, ओंकार पाठक, महावीर येणगुरे, सुनील दसले, गणेश सुरवसे, राजशेखर उमराणीकर आदी बहुसंख्य रसिक श्रोते, महिला वर्ग उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments