शाळा केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम नसून राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे केंद्र आहे–रेखा गाडेकर
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टेंभुर्णी येथे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी विकास यादव व केंद्रप्रमुख संतोष वरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०२ सप्टेंबर २०२५ शाळांमध्ये 'हमारा विद्यालय-हमारा स्वाभिमान' हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी शाळेच्या प्राचार्या रेखा गाडेकर बोलत होत्या.
यावेळी त्या पुढे म्हणाल्या की आपला भारत देश हा सर्व धर्म समभाव आहे. आपल्या गावात, राज्यात अनेक जाती-धर्माचे लोक राहत असतात. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक म्हणून एकत्रितपणे शाळा चालते. अशा शाळांवर शालेय व्यवस्थापन समिती, बाल संरक्षण समिती, महिला संरक्षण समिती, माता पालक व शिक्षक पालक अशा वेगवेगळ्या समित्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सामूहिक केंद्र म्हणजे शाळा आहे. विद्यार्थी व शिक्षक एकत्रितपणे शाळेतील स्वच्छता, शिस्तबद्धता व हरितमय वातावरण, विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन रुजविणे, राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता व नागरी कर्तव्यांचे पालन करणे. म्हणून शाळेला केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम म्हणून न पाहता राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे केंद्र म्हणून पहावे. नैसर्गिक पर्यावरण व मूल्यांचा जपणूक करणे अशी अनेक संकल्प हे विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक आहे.म्हणून प्रार्थनीय आपण मूल्यवर्धित परिपाठ हा घेत असतो.
यावेळी स्वप्नाली भोसले म्हणाल्या की विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, राष्ट्रीयभाव, सामाजिक समरसता व शाळेतील साधन संपत्तीची काळजी घेणे, नागरी कर्तव्याचे पालन करणे तरच विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित जीवनविचार विकसित होतील. यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका यशोदा गाडेकर, संस्थापक हरिचंद्र गाडेकर, सचिवा अर्चना गाडेकर, प्राचार्य रेखा गाडेकर, मनीषा सोनवणे, स्वप्नाली भोसले, पालक प्रतिनिधी सुनिता शिंदे याचबरोबर सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
.jpg)
0 Comments