मोहोळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी संदीप देशमुख
अनगर (कटूसत्य वृत्त):- राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष व मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बिनविरोध परंपरा असलेली मोहोळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित मोहोळ या पतसंस्थेच्या नूतन चेअरमन पदी संदीप दत्तात्रय देशमुख सहशिक्षक शिवाजी हायस्कूल पाटकुल यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते संदीप देशमुख यांचा अनगर येथे सन्मान करण्यात आला. यावेळी पाटील म्हणाले की या संस्थेला मोठी परंपरा आहे सर्व व्यवहार पारदर्शक आहेत संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी चांगले निर्णय घ्या असे म्हणून त्यांनी नूतन चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य चंद्रकांत ढोले, माजी प्राचार्य श्रीधर उन्हाळे, आयुब इनामदार,प्राचार्य बशीर बागवान,प्राचार्य सुधीर गायकवाड, माझी चेअरमन शरद म्हमाने, मुख्याध्यापक दत्तात्रय गावडे, रवी पाचपुंड, संस्थेचे संचालक कालिदास गावडे,आबाराव गावडे, सचिव विलास पासले, प्राध्यापक संभाजी चव्हाण, माधव खरात, नाईकनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments