Hot Posts

6/recent/ticker-posts

मुलींना रोडरोमियोंकडून होणाऱ्या त्रासाबद्दल शिवसेनेच्या वतीने निवेदन

 मुलींना रोडरोमियोंकडून होणाऱ्या त्रासाबद्दल शिवसेनेच्या वतीने निवेदन





 नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेचे फार मोठ्या प्रमाणात जाळे आहे. प्रत्येक मोठ्या गावातील शाळांना भेटी देत असताना किंवा त्या ठिकाणाहून वावरत असताना शाळा भरतेवेळी व सुटताना रोड रोमियोंचा मुलींना होणारा त्रास अनेक वेळा निदर्शनास आल्याने त्या शाळेकरी मुलींना होणाऱ्या त्रासाचा बंदोबस्त करणेसाठी मुख्याध्यापकांची तात्काळ बैठक लावण्याचे निवेदन ओबीसीचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी यांना निवेदन देण्यात आले आहे.
अनेक मुलींना शिक्षण घेणेसाठी खेड्यापाडयातून शहरांमध्ये येताना शाळेच्या बाहेर, बस स्थानकावर, शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत काही रोड रोमियो मोटरसायकल वरून कर्णकर्कश्य आवाज करीत मुलींच्या मागे पुढे फिरण्याच्या महिला पालकांच्या तक्रारीवरून दि.५ एप्रिल २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने गटशिक्षणाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रमुख, निर्भया पथकातील सर्व अधिकारी, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकां समवेत बैठक आयोजित केली होती. त्याच धर्तीवर सद्यस्थितीत रोडरोमीयोंचा त्रास दिसून येत असल्यामुळे अशा रोड रोमियोंचा त्रास थांबविण्यासाठी तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. सदरील निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी शिवसेनेचे महाळुंग शहर प्रमुख रोहित रेणके, नातेपुते दक्षिण शहरप्रमुख दादा वाघमारे, तालुका मीडिया प्रमुख फरीद शेख, दहिगाव शाखाप्रमुख दत्ता बोडरे, प्रतीक ओव्हाळ, दत्तनगर शाखाप्रमुख संजय खुसपे ग्रा. पं. सदस्य दहिगाव, दत्तनगर शाखाप्रमुख सोनू वाघ आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments