Hot Posts

6/recent/ticker-posts

देशाचे अपयशी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा

 देशाचे अपयशी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशामध्ये बेरोजगारीची संख्या वाढत चालली आहे,व्होट चोरी,एकीकडे  रेल्वे, बँका सरकारी यंत्रणांचे  खाजगीकरण  करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने सोलापूर शहर युवक काँग्रेस कडून  भारताचे अपयशी पंतप्रधान व बेरोजगारीचे जनक नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमीत्त सोलापूर खासदार प्रणिती शिंदे,महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मेघशाम धर्मावत, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे,सोलापुर युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे स्टेशन,सोलापूर महात्मा गांधी पुतळा समोर इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांकडून चहाची केटलीतून चहा देताना व फलक घेऊन राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला.
     
सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले 2 कोटी युवकांना दर वर्षी रोजगार, नोट बंदी ,जी.एस. टी, बँकांचे खाजगीकरण,GDP चे ढासळण्याचे कारणामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे देशाची आर्थिक बाजू नाजूक झाली आहे. देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे अग्निपथ योजनेसारखे फसव्या योजनेला युवा वर्ग कंटाळा आला आहे,एकीकडे देशात व्होट चोरी वाढली आहे.असेही म्हणाले तसेच सुशिक्षित बेरोजगार मोदींची कृपा, मोदी हटाव रोजगार बढाओ, मोदी हटाव देश का युवा बचाव,व्होट चोर गद्दी छोड,नोकरी चोर गद्दी छोड अशा घोषणा देण्यात आल्या.

ब्लॉक अध्यक्ष तिरुपती परकीपंडला,प्रदेश सचिव अनंत म्हेत्रे,प्रविण जाधव,रूपेश गायकवाड,उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे,सुशीलकुमार म्हेत्रे,सोशल मीडिया प्रमुख सुनील सारंगी,धीरज खंदारे,महेंद्र शिंदे, आशुतोष वाले ,विवेक कन्ना,संजय गायकवाड,सुभाष वाघमारे,किरण राठोड,सचिन पवार,आदित्य म्हमाणे,यासीन शेख,शशिकांत शेळके,योगेश रणधीरे,महादेव पराणे ,अभिषेक गायकवाड ळ,राहुल म्हेत्रे,जटेप्पा माने,चंद्रकांत नाईक,दिनेश डोंगरे,मुकुंद नाईक,युवराज दोडमनी,राज शिंदे,सोपान मिसाळ,गणेश नागशेट्टी,श्रीनिवास परकीपंडला,श्रीनिवास कोटा,फय्याज पठाण व आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments