Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.अजित गोरक्ष दळवी यांना मिळाली डॉक्टरेट पदवी

 डॉ.अजित गोरक्ष दळवी यांना मिळाली डॉक्टरेट पदवी





 माढा (कटूसत्य वृत्त):- भेंड ता- माढा येथील प्रा.अजित गोरक्ष दळवी  यांना   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) येथून व्यवस्थापन विषयात पीएच.डी. (Doctor of Philosophy) पदवी संपादन केली आहे.त्यांनी “An Analytical Study of Organic Food Producer Companies By Using BCG Matrix And Its Relevance On Marketing Strategies Adopted In Pune Region”.या विषयात संशोधन  प्रबंध  सादर केला होता.यासाठी त्यांना डॉ. सुनील धनवडे यांचे संशोधन मार्गदर्शन लाभले.
डॉ. अजित गोरक्ष दळवी हे मुंबई विद्यापीठातील एमबीएचे गोल्ड मेडलिस्ट असून सध्या ते डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे येथे एमबीए विभागात वरिष्ठ सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांना मिळालेल्या यशाबद्दल ज्ञानदिप अबॅकसचे राजेंद्र दळवी गुरुराज अबॅकसच्या संचालिका जयश्री जाधव ,रणजित जाधव विठ्ठल गुळमे यशवंत गुळमे विशाल सुर्वे धनाजी गुळमे मोहन गुळमे यांनी अभिनंदन केले.परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments