महापालिका हद्द, ग्रामीण मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग यांची पावसामुळे चाळण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील वर उल्लेख केलेल्या सर्व रस्ते यांची पावसामुळे प्रचंड मोठी चाळण झाली आहे,सदर अनेक रस्ते वाहुन गेले आहेत,रस्ते वरील छोटे मोठे पुल,सुरक्षाकठडे, वाहुन गेले आहेत,तसेच रस्ता वर प्रचंड मोठे खड्डेचे साम्राज्य निर्माण झाले आहे,सदर रस्ता वरून जनता अक्षरक्ष आपली वाहने जीव मुठीत धरून चालवत आहेंत.तसेच ज्या सरकारी इमारती व कार्यालय मधुन राज्याचा राज्यकारभार सुरू असतो तेच कारभार चालविणारे कर्मचारी यांनाच कार्यालय व सरकारी घरांची पडझड झाल्याने अक्षरक्ष हतबल होऊन सरकारी काम करावे लागत आहे
राज्य शासनाकडे सदर कामे करण्याकरीता अक्षरक्ष निधीच उपलब्ध नाही,राज्यावर कर्जाचा डोंगर आहे,कारण मागील दीड दोन वर्षांपासून विकासकांनी केलेल्या राज्यातील विकास कामांचे देयके शासनाकडे निधी उपलब्ध होत नाही यामुळे आता ही अत्यंत महत्त्वाची कामे करण्याकरिता शासन कडे निधीच उपलब्ध होत नाही यामुळे राज्यातील या चाळण व खडृडेमय रस्ते वरून जाणरे वाहन धारक व सरकारी कार्यालये काम करणारे व इमारती मध्ये रहाणारे सरकार कर्मचारी यां सगळ्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे .
दुसरे बाजुस ही सगळी शासनाची नवीन कामे गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून बंद असल्याने नवीन विकासात्मक गोष्टी बंद आहेत ,राज्याच्या विकासाची चक्रे तर कधीच जागेवर थांबली आहेत याचा दुष्परिणाम म्हणजे संबंध शेती नंतरचा सगळ्यात मोठा करोडो लोकांच्या हाताला काम देणारा रोजगार अक्षरक्ष बंद पडला आहे, पण यामुळे या गोष्टीचा सामाजिक व मानसिक दडपण येऊन पुढील काळात समाजातुन फार मोठे अनाकलनीय गोष्टी ( ज्या अर्थी एका जिल्हा च्या मिरवणुकीत वीस हजार जोडे अस्ताव्यस्त झालेले सापडले आहेत असे सांगितले जाते ) यामधून घडु शकतील यासाठीच आता शासनाने या गोष्टी पाच ( सुधारणा ,विकास, जीवितहानी,रोजगार, निधी ) कलमी कार्यक्रम मध्ये सामील करून यावर तातडीने पाऊल उचललेली गेली पाहीजे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री संबध मंत्रीमंडळ यांना महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन फोरम चे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांनी या पत्राद्वारे केले आहे.
0 Comments