मोहोळ:(कटूसत्य वृत्त):- मुंबई येथे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांनी आझाद मैदान
मुंबई या ठिकाणी मुंबईचे अॅड. आशिष गायकवाड, मोहोळचे अॅड. श्रीरंग लाळे, साताऱ्याचे राजेंद्र निकम व इतर अभ्यासकांसोबत मराठा-कुणबी व कुणबी-मराठा, राज्यातील विविध गॅझेट
व आरक्षणाच्या इतर मुद्दयांच्या समन्वयाखाली टीम काम करत संदर्भात चर्चा केली.
अॅड. श्रीरंग लाळे यांनी चर्चेदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील हैदराबाद गॅझेटमध्ये अंतर्भूत नसलेल्या हैदराबाद संस्थांमधील सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांच्या कुणबी नोंदीबाबत माहिती दिली. हैदराबाद गॅझेटमध्ये ५८ गावांच्या नोंदींचा समावेश करण्याच्या अनुषंगाने मागणी केली पाहिजे, अशीही विनंती केली.
सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांच्या कुणबी नोंदीबाबत माउली पवार यांच्या असल्याबाबत ही चर्चा केली.
५८ गावांबाबत पंडित ढवण यांनी काही महत्त्वाचे दस्तऐवज उपलब्ध करून दिले. सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये मोहोळ तालुक्यातील वाळूज, देगाव (वा.), एकुरके, मसले चौधरी अशा अनेक गावांचा समावेश आहे. ५८ गावांचा हैदराबाद गॅझेटच्या नोंदणीमध्ये समावेश झाल्यास यां गावांना आरक्षणाचा मोठा फायदा होणार असल्याचे अॅड. श्रीरंग लाळे यांनी सांगितले.
0 Comments