अक्कलकोटच्या विकासामध्ये अभियंत्यांचे फार मोठे योगदान आहे- जन्मेजयराजे भोसले
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अभियंता हे राष्ट्र विकासासाठी राष्ट्राच्या बांधणीसाठी झटत आहेत अक्कलकोटच्या विकासामध्ये अभियंत्यांचे फार मोठे योगदान आहे. सर विश्वेश्वरय्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचे कुरनूर धरणाचे काम त्यावेळी अक्कलकोट नरेश विजयसिंहराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली आराखडा तयार करण्यात आला होता.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची नूतन ६५ कोटी रुपयांची इमारत ही सुरू आहे.विविध क्षेत्रातील अभियंत्यानी आपल्या कामाद्वारे अक्कलकोट नगरीच्या विकासासाठी योगदान द्यावे.अक्कलकोट लायन्स क्लब चे काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे.लायन्स क्लबच्या वतीने ,विविध उपक्रम राबविले जाते, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी केले.
अक्कलकोट लायन्स क्लब च्या वतीने सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनी लायन्स आदर्श अभियंता पुरस्कार अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील वीस अभियंतांचा सत्कार समारंभाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट च्या कार्यालयात सोमवारी करण्यात आले होते .यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंह राजे भोसले यांच्या हस्ते अभियंत्यांचा शाल ,सन्मानचिन्ह ,मोत्याची माळ व बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे , लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. अभय खोबरे , ट्रस्ट चेअरमन लायन राजेंद्र हत्ते , लायन शिरीष पंडित ,सचिव लायन शिवशरण खुबा , खजिनदार लायन विठ्ठल तेली , लायन मल्लिकार्जुन मसुती , लायन प्रभाकर मजगे , लायन शिवपुत्र हळगोदे , उपाध्यक्ष ला. सुभाष गडसिंग , ला. चेतन जाधव ला. मल्लिनाथ साखरे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
लायन्स आदर्श अभियंता- २०२५ या पुरस्कार
अभियंता महेश गीरमलप्पा कल्याणशेट्टी, एचओडी ,अभियंता अमोल रामचंद्र खमीतकर, उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,अभियंता राजू हणमंतु आडम, उपकार्यकारी अभियंता, एमएसईबी,
अभियंता अमोल जितेंद्र भामरे, नगर अभियंता, नगर परिषद अक्कलकोट,अभियंता शुभम पंजाबराव माहुरे, नगर रचनाकार, नगर परिषद अक्कलकोट ,
अभियंता राजेंद्र शिवशंकर लिंबीतोटे, महानगरपालिका,अभियंता , योगेश बाबुराव अहंकारी, वास्तुविशारद ,अभियंता , श्रीशैल बसवराज तानवडे, प्राध्यापक, सिंहगड कॉलेज, सोलापूर ,
अभियंता अमोल अरविंद भावतनक, एचओडी, कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन कॉलेज, अक्कलकोट,
अभियंता अमित अशोक थोरात, अक्कलकोट,
अभियंता अमोल चंद्रकांत मुदगल, अक्कलकोट ,
अभियंता अमर अशोक बोदांडे, अक्कलकोट,
अभियंता प्रथम मल्लीकार्जून मसुती,
अभियंता रोहीत अभय खोबरे,
अभियंता मुस्तफा अशपाक बळोरगी,
अभियंता विकास धोंडीबा कुंभार,
अभियंता रोहीत विजय मोरे,
अभियंता अनुज शिवानंद लच्च्याण,
अभियंता समीर फुलारी , अक्कलकोट आदीचां सह कुटूंब सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अभियंता डॉक्टर महेश कल्याण शेट्टी ,राजेंद्र लिंबू तोटे ,शुभम माहुरे , योगेश अंहकारी आदीनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे स्वागत लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन राजेंद्र हत्ती यांनी केले.या कार्यक्रमास बाळासाहेब कुलकर्णी देसाई राहुल आळंद विजय मोरे सुरेश भोसले अशोक कडगंजी राजकुमार विभुते रमेश शिंदेक्लास क्लबच्या प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीदेवी खुणे कापसे शिशु मुख्याध्यापिका महानंदा निलगात वैभव चिंचोळे मैंदर्गी , एम जी स्वामी , रियाज शेटे , अशोक काकडे आदिसह शिक्षक वर्ग , अभियंता , लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट -
लायन्स क्लबमधील शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी अन्नछत्र मंडळाच्या विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्यावतीने वॉटर क्युरी फायर देण्यात येईल - जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले , संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ
0 Comments