मेहनत आणि शिस्त हीच खरी यशाची गुरुकिल्ली - आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभदा पाटील
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- ‘कोणत्याही क्षेत्रात स्वतःलाच मेहनत करून यशाची शिखरे गाठावी लागतात. यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो म्हणून स्पर्धकांनी प्रचंड मेहनत घेवून आणि शिस्तप्रिय खेळ दाखवत यश मिळविणे गरजेचे आहे. कारण मेहनत आणि शिस्त हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.’ असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन खेळाडू व पंढरपुरातील नरीश टू बिल्ड च्या संस्थापिका शुभदा पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संलग्नित गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने स्वेरीमध्ये दि. १८ व १९ ऑगस्ट २०२५ दरम्यान आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून आंतरराष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन खेळाडू व पंढरपुरातील नरीश टू बिल्ड च्या संस्थापिका शुभदा पाटील ह्या मार्गदर्शन करत होत्या. उदघाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभदा पाटील यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाले. स्पर्धेत मुलींच्या गटात वालचंद अभियांत्रिकीची आंतरराष्ट्रीय खेळाडू रिद्धी उपासे हिने सहापैकी सहा गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकाविले व मुलांच्या गटात वालचंद अभियांत्रिकीच्याच आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त रजत आडम याने ७ गुणांसह विजेतेपद मिळविले तसेच सांघिक स्पर्धेत मुलांमध्ये वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने स्पर्धेत वर्चस्व राखले व मुलीत मंगळवेढ्याच्या श्री. संत दामाजी महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. अंतिम निकाल (अनुक्रमे १ ते ६, गुण व बोकोल्स गुणांसह) वैयक्तिक मुले रजत आडम ७, वालचंद अभियांत्रिकी, पंडल नवीन ६ (२७) एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी, शहा तनिष्क ६ (२६) वालचंद अभियांत्रिकी, सागर चौगुले ५.५ (३२.५) माढा कॉलेज, ५ ओम रोंगे ५.५ (२७.५) संगमेश्वर कॉलेज ६ जाधव सुमित ५ सांगोला कॉलेज. मुलीः रिद्धी उपासे ६ वालचंद अभियांत्रिकी, वडीशेरला नवीना ५ हिराचंद नेमचंद कॉलेज, येलदी सृष्टी ४.५ डी. बी. एफ. दयानंद कॉलेज, कोरे मयूरी ४.५ एस. बी. पाटील, मंद्रुप, साक्षी पाटील डी. बी. एफ. दयानंद, शिंदे तृप्ती ४ श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा ४ सांघिक (प्रथम तीन): मुले वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर (८ गुण), एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर (७), बी.एम.आय. टी. कॉलेज, बेलाटी (५). मुली श्री. संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा (३, ६), संगमेश्वर कॉलेज, सोलापूर (३, ५ गुण, स्वेरी, पंढरपूर (२). बक्षिस वितरण समारंभ स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, प्रा. आनंद ढवण, प्रा. दिपक भोसले, प्रा. गणेश जोरवर, प्रा. एस. एस. गायकवाड, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस.मठपती, क्रीडा संचालक गोकुळ यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, प्रज्वल कोरे, यश इंगळे यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले. यावेळी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना व विजेत्या संघांना सन्मानित करण्यात आले. सदर आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील ९८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यावेळी विश्वस्त एच. एम. बागल, डॉ.यशपाल खेडकर, सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, पात्रता समितीचे सदस्य प्रा. बाळासाहेब वाघचवरे, प्रा. आनंद चव्हाण, प्रा. किरण चौगुले, प्रा. आनंद ढवण, निवड समितीचे चेअरमन प्रा. डॉ. एस. आर. भोसले, सदस्य प्रा. जे. वाय. चेडे, प्रा. डी. एस. भोसले (सदस्य) तसेच क्रीडा संचालक उपस्थित होते. यावेळी डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
0 Comments