विवाह सोहळयात डामडोल नको; साधेपणा हवा
मराठा वधू-वर मेळाव्यात समाजाचा निर्णय
शहर जिल्ह्यातील चारशे वधू-वरांची उपस्थिती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधू-वर परिचय मेळाव्यात सोलापूर शहर जिल्ह्यातील वधू-वर आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. तब्बल चारशे वधू-वरांची उपस्थिती मेळाव्यास होती. आई-वडिलांनी आपल्या पाल्यांचा विवाह करताना विवाह सोहळ्याचा डामडौल न करता साधेपणाने सोहळा करावा असा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
रविवार दि.24 ऑगस्ट रोजी आरटीओ ऑफिस जवळ असलेल्या आदित्य नगर सांस्कृतिक भवन येथे मराठा समाजाचा 31 वा वधू- वर परिचय मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मराठा नागरि पतसंस्थेचे चेअरमन तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या उज्वलाताई साळुंखे, जिल्हाध्यक्ष डॉ.जी. के. देशमुुख, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील उपस्थित होते.
यावेळी विचारपीठावर संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत, प्रकाश ननवरे, दिनकर देशमुख, दत्ता जाधव, राजू व्यवहारे, राम माने ,हनुमंत पवार, आर. पी. पाटील, तानाजी चटके, नागनाथ पवार, सुशील गवळी ,अंबादास सपकाळे् ,लिंबराज जाधव परशुराम पवार, शिरीष भोसले, पांडुरंग झांबरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मातांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. गोवर्धन गुंड यांनी जिजाऊ वंदना सादर केली. मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी वधू-वर परिचय मेळावा घेण्यामागची भूमिका आपल्या प्रास्ताविक भाषणातून विशद केली.
पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठा समाजामध्ये नव्हे तर इतर समाजामध्ये देखील मुलींची संख्या कमी होत असल्याची बाब चिंताजनक आहे. पालकांनी आपल्या मुलाचा अथवा मुलीचा विवाह ठरवताना संपत्ती अथवा पॅकेज कडे न पाहता स्वकर्तृत्व पाहून विवाह करावेत. पत्रिकेवर अवलंबून राहू नये असे मार्गदर्शन केले.
अमोल शिंदे यांनी विवाह सोहळे करताना पालकांनी कोणताही डामडौल न करता साधेपणाने विवाह सोहळे साजरे करावेत. मुलगी देताना मुलांचे कर्तुत्व पाहावे तरच समाजाच्या वतीने घेण्यात येणार्या वधू-वर परिचय मेळाव्याचा उद्देश सफल होईल असे सांगितले.
डॉ.जी. के. देशमुख , सूर्यकांत पाटील ,उज्वला साळुंखे यांचे देखील मार्गदर्शन झाले. मुलांची लग्न जमण्यास अडचणी येत आहेत. पालकांनी मुलगी देताना फार मोठ्या अपेक्षा ठेऊ नये. कर्ज काढून विवाह सोहळे साजरे करू नये असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लक्ष्मण महाडिक यांनी केले तर आभार हणुमंत पवार यांनी मानले, मेळावा यशस्वी करण्यासाठी नवनाथ कदम, अविनाश गोडसे, दीपक शेळके, कल्याण गव्हाणे सचिन चव्हाण. प्रकाश डोंगरे, रमेश जाधव ,नितीन मोहिते, राजू मिरकले, रुपेश भोसले यांनी परिश्रम घेतले
चौकट
मेळाव्यास आलेल्या वधू वर यांच्या बायोडाटाचे वाचन अंजली जाधव, संजीवनी मुळे, प्रज्ञा भोसले, लता ढेरे.यांनी केले. तर नोंदणीसाठी .. वैभवी पवार, श्रावणी माने, राजू व्यवहारे,. सागर रेवडकर., मेजर मोहिते, कारंडे, प्रभाकर शिंदे... यांचे सहकार्य लाभवले.
0 Comments