अमेरिकेच्या दबावाला झुकू नका; फासीवाद-नवफासीवादाचा धोका ओळखा”- कॉ. प्रकाश करात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 25, 2025

अमेरिकेच्या दबावाला झुकू नका; फासीवाद-नवफासीवादाचा धोका ओळखा”- कॉ. प्रकाश करात

 अमेरिकेच्या दबावाला झुकू नका; फासीवाद-नवफासीवादाचा धोका ओळखा”- कॉ. प्रकाश करात



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी महासचिव कॉ. प्रकाश करात यांनी माकपच्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरात शाखा सचिवांना मार्गदर्शन करताना दोन महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले – भारताच्या ऊर्जा सुरक्षेवरील अमेरिकेचा दबाव आणि फासीवाद-नवफासीवाद, अंध राष्ट्रवाद यांचा वाढता धोका.

करात म्हणाले की, "भारताने इराण, व्हेनेझुएला आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेच्या दबावाखाली न येता स्वतंत्र ऊर्जा धोरण राबवले पाहिजे.

"२०१९ मध्ये सुद्धा माकप च्या पॉलिट ब्युरो ने अमेरिकेच्या एकतर्फी बंदिशांना अवैध ठरवत भारताने इराणकडून स्वस्त दरात तेल खरेदी सुरू ठेवावी, अशी भूमिका मांडली होती.

२०१९ मध्ये व्हेनेझुएलानेकडून भारताने तेल खरेदी करू नये, या अमेरिकेच्या सूचनांवर अवलंबून न राहता लोकहित लक्षात घेऊन देशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करावी. अशी भूमिका माकपने मांडली होती.

" आज रशियाकडून तेल खरेदी थांबविण्याचा अमेरिकेचा दबाव लोकहिताविरुद्ध असून मोदी सरकारने तो ठामपणे नाकारावा, असे पक्षाने स्पष्ट केले."

करात यांनी स्पष्ट केले की, “भारताची ऊर्जा सुरक्षा लोकहितावर आधारित असावी. अमेरिकेच्या दबावाला ला मान्यता देणे म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड आहे.”

करात यांनी शाखा सचिवांना फासीवाद, नवफासीवाद, अंध राष्ट्रवाद आणि प्रतिक्रियावादी प्रवृत्ती यांविषयीही मार्गदर्शन करताना सांगितले की, "आज फासीवाद-नवफासीवादाचा धोका, तसेच अंध राष्ट्रवाद व प्रतिक्रियावादी प्रवृत्तीमुळे लोकशाही व सामाजिक ऐक्याला गंभीर आव्हान निर्माण झाले आहे".

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages