Hot Posts

6/recent/ticker-posts

हर घर तिरंगा मोहिम; पंढरपूरात भव्य तिरंगा रॅली संपन्न

 हर घर तिरंगा मोहिम; पंढरपूरात भव्य तिरंगा रॅली संपन्न



 

       पंढरपूर,(कटूसत्य वृत्त):- 'हर घर तिरंगा' मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तिर्रगा रॅलीस शहरातील विविध विद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
     भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापनदिना निमित्त पंढरपूर नगरपरिषदे‌च्या वतीने  लोकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजासोबत प्रत्येक नागरिकाचा वैयक्तिक बंध जोडणे, या उदात्त उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये लोकमान्य विद्यालय, गौतम विद्यालय, कवठेकर प्रशाला, द.ह कवठेकर प्रशाला, अरिहंत विद्यालय, आपटे उपलप प्रशाला, ईश्वर अम्मा प्रशाला, यशवंत विद्यालय, विवेक वर्धिनी विद्यालय, औदुंबर पाटील विद्यालय आदी  शाळांचे विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
                   भारत माता की जय, वंदेमातरम्, वंदेमातरम्, भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो,  घर-घर तिरंगा हर घर तिरंगा" च्या जयघोषाने शहरातील वातावरण देशभक्तीमय, देशभक्तीने मंत्रमुग्ध झाले होते.प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाथी तिरंगा झेंडा फडकवीत सदर रॅली  शिस्तबध्द रीतीने पार पडली. सदर रॅली शहरातील प्रद‌क्षिणा मार्गावरून संचलन करीत जिजामाता उद्यान येथे समाप्त झाली.  रॅलीमध्ये नगरपरिषद अधिकारी,  कर्मचारी व पंढरपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.
Reactions

Post a Comment

0 Comments