Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री गणपती फार्मसी मध्ये क्वालिटी अश्युरन्सवर वर्कशॉप संपन्न

 श्री गणपती फार्मसी मध्ये क्वालिटी अश्युरन्सवर वर्कशॉप संपन्न




टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णी महाविद्यालयामध्ये "क्वालिटी अश्युरन्स इन फार्मा: ब्रिजिंग अकॅडेमिया अँड इंडस्ट्री" या विषयावर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आशुतोष पंके सध्या असिस्टंट मॅनेजर , सिप्ला गोवा उपस्थित होते. मागील १० वर्षाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव, क्वालिटी अश्युरन्स विभागाचे औषधनिर्माण कंपनीमध्ये असणारे महत्व, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यावर त्यांनी प्रकाश टाकला. 
त्याचबरोबर औषधनिर्माण कंपनीमध्ये असणारे सर्व विभाग आणि त्यांचे कामकाज याबद्दलही माहिती विद्यार्थ्यांना दिली. सर्व बी. फार्म विद्यार्थी वर्कशॉपसाठी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव शिंदे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. प्रशांत मिसाळ यांनी केले.
यावेळी संस्था सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे, अध्यक्ष अँड विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे, ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नामदेव शिंदे, डॉ. सचिन सकट, डॉ. प्रशांत मिसाळ, प्रा. शिवराज ढगे, प्रा. शैलेश पेंडोर आदी शिक्षक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments