बाळे शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब काटकर
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था बाळे सोलापूरच्या चेअरमनपदी माळशिरस तालुक्याचे संचालक तात्यासाहेब शिवाजी काटकर यांची तर व्हाइस चेअरमनपदी शिवाजी थिटे यांची एकमताने, पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळाने निवड केली. गेली अनेक वर्षे हि पतसंस्था शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पारदर्शक व्यवहार करीत आहे.
100 कोटींची उलाढाल असलेल्या पतसंस्थेने गेल्या महिन्यात सभासदांना नऊ टक्क्यांनी डिव्हिडंट वाटप केला असून,वर्षातून दोन वेळा व्याज वाटप करते. सर्वात कमी व्याजदर असलेल्या पतसंस्था वर्गणीवर व्याज देणारी शिक्षक पतसंस्था महाराष्ट्र पहिली आहे असे नूतन पदाधिकारी म्हणाले. सभासदांच्या पाल्यांच्या लग्नकार्यात 11 हजारांची मदत देते तसेच सभासदांचे पाल्यांना 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेत 75 टक्के, शिष्यवृत्ती, नवोदय, एन.एम.एस व राष्ट्रीय, राज्य खेळाडूंचा गौरव करून सत्कार केला जातो. अशा अनेक वैशिष्ट्यने पतसंस्था कमकाज करत असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पतसंस्था राज्यस्तरीय झाली. बार्शी व पंढरपूर तसेच मुंबई येथे लवकरच शाखेचे उद्घाटन होणार आहे. तसेच सभासदांच्या मागणीप्रमाणे लवकरच कर्ज मर्यादा वाढविली जाणार आहे. कागद विरहीत पतसंस्था झाली आहे. हे सर्व आम्ही करत आहोत कारण सभासदांचा विश्वास आणि आमदार दत्तात्रय सावंत सरांचा पाठीवरचा हात जे काही करायचे आहे ते प्रामाणिक व सभासदांच्या हितासाठी करा असे प्रत्येकवेळी सरांचे शब्द खरेच चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळाने पाळले व यापुढेही असेच काम करण्याची ग्वाही आम्ही देत आहोत असे नूतन पदाधिकारी म्हणाले.
0 Comments