Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील मतदार याद्यांवरही संशयाचे धुके !

 महाराष्ट्रातील मतदार याद्यांवरही संशयाचे धुके !




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बिहारमधील मतदार याद्या अद्ययावत करण्यावरुन रणकंदन माजले असताना आता महाराष्ट्रातील मतदार याद्यांवरही संशयाचे धुके वाटू लागले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसमध्ये एकाच धर्माचे ११९ मतदार एकाच घरातले असल्याचे समोर आले आहे. स्वतः घरमालकच चकित ढाले की, एवढे लोक आपल्या पत्त्यावर कसे? पालघर जिल्ह्याच्या नालासोपारामध्ये मतदार म्हणून एकोणचाळीस वर्षीय महिलेचे नाव सहा वेळा आढळले आहे.महाराष्ट्रातही मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची मोहीम हाती घेतली तर या याद्यांच्या अचूकतेबाबतच्या शंका योग्य की अयोग्य, हे ठरेल.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात तब्बल २५,८२० मतदारांची नावे दुहेरी नोंद झाल्याचे धक्कादायक आरोप होत असल्याची बातमी समोर आली आहे.
प्रश्न असा की हीच नावे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदार याद्यांमध्ये होती का?या दुहेरी नोंदीच्या आधारावर मागील निवडणुकांमध्ये किती दुहेरी मतदान झाले?
मागील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि केवळ एका तालुक्यात एवढा मोठा घोळ झालेला असेल तर इतर मतदारसंघांमध्ये किती गंभीर गोंधळ असू शकतो, याची कल्पनाच करवत नाही.
म्हणूनच महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांच्या मतदार याद्यांची स्वायत्त, सखोल आणि पारदर्शक चौकशी न्यायालयाच्या माध्यमातून करणे अत्यावश्यक आहे. म्हणजे संपूर्ण वास्तव जनतेसमोर येइल.निवडणूक आयोग आणि प्रशासनाने या चौकशीसाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये कसा घोळ झाला याचे पुरावे दिल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आता महाराष्ट्रातही मतदार यादीतले घोळ मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं बनावट मतदारांच्या मदतीनं भाजपला मदत केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यात 4 मोठे घोळ उघड झाले आहे. त्यामुळे मतदार याद्यांवर संशय व्यक्त केला जातोय.पैठण, चंद्रपूर, नालासोपारा आणि नाशिक राज्यातील ही चार ठिकाणं. पण यांच्यात एक समान धागा आहे, तो म्हणजे घोळ.
  पैठण शहरात जवळपास सव्वीसशे मतदारांची नावं डबल आहेत. पैठणमधून इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांची ही नाव आहेत. इतरत्र स्थायिक झालेल्या मतदारांनी आधी असलेल्या मतदार यादीतील नावे वगळली नाहीत. त्यामुळे दुहेरी नावं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

तर राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं मतचोरी आणि बनावट मतदानातून विजय मिळवल्याचा आरोप केला होता. तसंच महाराष्ट्रात 5 महिन्यात 40 लाख मतदार वाढल्याचा दावाही राहुल गांधींनी केला होता. आणि त्यानंतर राज्यात मतदार यादीतील घोळांची मालिकाच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना मतदारयाद्या तपासण्याचे आदेश दिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावात एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. एकाच घरात तब्बल 119 मतदारांची नोंद सापडलीय. छोट्याशा घरात 119 मतदारांची नोंदणी कशी होवू शकते, असा प्रश्न आता निर्माण झालाय. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदार यादीची तपासणी केल्यावर हा प्रकार उघड झाला. 119 मतदार बोगस तर नाहीत ना, अशी शंकाही उपस्थित झालीय.


राज्यात चांदा ते बांदा मतदार यादीतील घोळ पाहायला मिळत आहेत. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात माता जीवदानी चाळ इथल्या सुषमा गुप्ता या महिलेचं मतदार यादीत तब्बल सहा वेळा नाव असल्याचा प्रकार समोर आलंय. एकाच पानावर सुषमा गुप्ता यांचं नाव सहा वेळा असल्याचं पाहायला मिळतं आहे.
नाशिकमध्ये तर बोगस व्होटर आयडीच आढळून आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी योगेश गांगुर्डेंनी हा पर्दाफाश केला. एकाच नावाने 3 बनावट मतदान कार्ड  पाहायला मिळत आहेत. सुनील रवींद्र वाजपेयी या मतदाराचे तीन वेगवेगळे कार्ड आहेत. पण वडिलांचं आडनाव मात्र चौधरी असं आहे. विवेक मुन्डले आणि योगेश काळुंगे ही नावं वेगळी आहेत, पण फोटो मात्र एकच आहे. विहंग परब याच्या वडिलांचं आडनाव वैद्य झालंय. आणि मिना कळमकर या महिला मतदाराच्या आयडीवर चक्क पुरूषाचा फोटो पाहायला मिळतोय.
एकंदरीतच राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतचोरी झाल्याचे आरोप केले होते. त्यानंतर मतदार यादीतील घोळांची मालिकाच सुरू झालीय. घोळांची ही मालिका विरोधकांच्या आरोपांना बळ देणारी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं या सर्व प्रकारावर खुलासा करण्याची गरज आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments