दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा वाढदिवस पंढरपूर आणि परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गादेगाव (ता. पंढरपूर) येथे वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांना चालू घडामोडींचे ज्ञान मिळावे, यासाठी येथील शाळेला जिओ टीव्ही भेट देण्यात आला.
कोर्ट येथील शंभू महादेवाला दिलीप धोत्रे यांच्या दीर्घायुष्यासाठी व पुढील कार्यासाठी श्रेयश दिलीप धोत्रे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. तर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे मिष्ठान्न भोजन देण्यात आले. पंढरपूर येथील गोरगरीब रिक्षाचालकांना मोफत गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी पंढरपूर येथील शेकडो रिक्षाचालकांनी एकत्र येत दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, माढा विधानसभेचे आ. अभिजित पाटील यांनी धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच दिलीप धोत्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी पंढरपूर येथील मनसे कार्यालयात गर्दी केली होती. पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
0 Comments