पंढरपूर नगरपालिका लावणार ३२ हजार वृक्ष
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपरिषदेला हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी सुमारे ३२ हजार ५०० वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
दरम्यान, पंढरपूर नगर पालिकेकडून हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र व माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवडीचा संकल्प करून १ ऑगस्टपासून प्रत्यक्ष= वृक्षारोपण अभियानास सुरुवात केली आहे.
राज्य शासनाकडून हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र तसेच माझी वसुंधरा आदी अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या अभियानांतर्गत १ ऑगस्ट रोजी पंढरपूर शहरातील पद्मावती उद्यान कॉर्नर ते बडोदा बँक ते स्टेशन रोड
येथील रस्ता दुभाजकांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.
पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे.
या वृक्षलागवड कार्यक्रमाच्या प्रारंभावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी, नगर अभियंता प्रकाश केसकर, पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे, लेखापाल करुणा शेळके, लेखापरीक्षक प्रशांत पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, उपनगर अभियंता सुमित
पाटील, भांडार विभाग प्रमुख विजय शहाणे, स्वच्छता निरीक्षक नाना गोरे, उद्यान विभाग प्रमुख सुवर्णा हाके, चिदानंद सर्वगोड, अनिल अभंगराव, चेतन चव्हाण, ईश्वर कट्टी, कृष्णकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली.
0 Comments