अन्नछत्रतर्फे आढळराव-पाटील यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 19, 2025

अन्नछत्रतर्फे आढळराव-पाटील यांचा सत्कार

अन्नछत्रतर्फे आढळराव-पाटील यांचा सत्कार



अक्कलकोट : माजी खासदार व महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळाचे पुणे विभागाचे अध्यक्ष व श्री क्षेत्र भिमाशंकर देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला सदिच्छा भेट दिली. न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या धार्मिक क्षेत्रातील महाप्रसादालयात भक्तांना एकाच छताखाली सर्वत्या सोयी सुविधा देण्यामध्ये श्री क्षेत्र अक्कलकोटातील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व श्री क्षेत्र शेगाव येथील महाप्रसादालय या दोन्ही संस्थानचे कार्य हे एका नाण्यांचे दोन बाजू असल्याचे मनोगत आढळराव-पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी न्यासाचे बाळासाहेब गाडगे, स्वराज घाडगे, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, तानाजी पाटील, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, एस के स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages