Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रत्येक गावांतील पायाभूत सुविधा मजबूत करणार

 प्रत्येक गावांतील पायाभूत सुविधा मजबूत करणार


आ. कल्याणशेट्टी : तालुक्यात विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा

हंजगी : (कटूसत्य वृत्त):-   अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गावांना भरीव विकास निधी देऊन प्रत्येक गावांतील पायाभूत सुविधा मजबूत करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आ. कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उमेश पाटील, मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, विलास गव्हाणे, रमेश क्षीरसागर, बसवराज

पाटील, मोहसिन मुल्ला, संतोष म्हमाणे, दयानंद कोळेकर, राजशेखर पाटील, प्रकाश कुंभार, रोहिदास

राठोड, श्रीपती बाणेगाव, रेवणू कुंभार, देविदास पवार, बापू पवार, सोमलिंग व्हनमाने यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हंजगी येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हंजगी- अक्कलकोट रस्त्याचे भूमिपूजन,अंबाबाई मंदिर सभामंडप लोकार्पण आणि बिरलिंगेश्वर मंदिर समोरील सभामंडपचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी हंजगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार सचिनकल्याणशेट्टी यांचा जेसीबीने पुष्पहार घालून यथोचित सन्मान करीत आभार मानले. आ. कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून हंजगी गावाला जोडणारे सर्वच रस्ते जोडले जात आहेत.


चौकट १ 

हालचिंचोळी व हंजगी तलावात उजनीचे पाणी सोडण्याची मागणी

तालुक्यातील कुरनूर धरणात आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य गावातील

तलावात सध्या उजनीचे पाणी येऊन पोहचल्याने या भागातील बळीराजा सुखावला गेला आहे. परंतु तालुक्यातील हालचिंचोळी आणि हंजगी या दोन मोठ्या तलावात मात्र अजूनही उजनीचे पाणी पोहचले नाही. या भागातील शेतकरी व सामान्य नागरिकांनी हालचिंचोळी आणि हंजगी तलावात पाणी सोडण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments