Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्या रा त २० लाख एकर क्षेत्रावर पिकांचे नुकसान

 राज्या  रा त २० लाख एकर क्षेत्रावर पिकांचे नुकसान

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील २० लाख १२ हजार ७७५ एकर क्षेत्राच्यावर पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील ११ जिल्ह्यात दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त बाधित झाले आहेत. यात सर्वाधिक नुकसान नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात झाले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साधारण आठवडाभरापासून राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक भागात तर अतिवृष्टी झाली असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

१९ जिल्ह्यात झाला मुसळधार पाऊस

राज्यातील तब्बल १९ जिल्ह्यांमधील १८७ तालुके आणि ६५४ महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार ८ लाख ५ हजार ११० हेक्टर म्हणजे तब्बल २० लाख १२ हजार ७७५ एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र असलेले ११ जिल्हे समोर आले आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments