Hot Posts

6/recent/ticker-posts

गोकुळअष्टमीच्या निमित्ताने ऑर्किड मध्ये रंगला दहीहंडी सोहळा

 गोकुळअष्टमीच्या निमित्ताने ऑर्किड मध्ये रंगला दहीहंडी सोहळा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी यांच्या हस्ते पाळणा पूजन करून करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभूते, यशराज करजगी, स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, स्कूलच्या मार्गदर्शिका मीना पारखे, आदि मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी  बाल श्रीकृष्णाच्या व राधाच्या वेशभूषा करून आले होते. या निरागस बालचमूमुळे शाळेच्या परिसरास गोकुळाचे रूप प्राप्त झाले होते. यावेळी विद्यार्थ्यानी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
शाळेच्या प्रांगणात दही दुधाने भरलेली दहीहंडी  विद्यार्थ्यांनी  गोविंदा रे गोपाळा,यशोदेच्या तान्ह्या बाळा या गाण्यावर थिरकत थिरकत मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडली.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी यांनी विद्यार्थ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिप्ती निंबर्गीकर यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.                 
Reactions

Post a Comment

0 Comments