Hot Posts

6/recent/ticker-posts

धारदार शस्त्र बाळगुण गावामध्ये दहशत माजवणारे आरोपी नातेपुते पोलिसांच्या ताब्यात

 धारदार शस्त्र बाळगुण गावामध्ये दहशत माजवणारे आरोपी नातेपुते पोलिसांच्या ताब्यात




नातेपुते(कटूसत्य वृत्त):- मौजे फोंडशिरस तालुका माळशिरस येथील उमाजी नाईक चौकात ओंकार राजेंद्र गोरे वय-२० वर्षे , रोहित शंकर पारसे वय-२० वर्षे दोघे रा फोंडशिरस ता माळशिरस हे दोघे हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांना मिळताच वरील आरोपी ओंकार गोरे रोहित पारसे यांना नातेपुते पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. 
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती नुसार शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना ओंकार राजेंद्र गोरे वय-२० वर्षे , रोहित शंकर पारसे वय-२० वर्षे दोघे रा फोंडशिरस ता माळशिरस हे  हातात धारदार शस्त्र घेऊन फोंडशिरस येथील उमाजी नाईक चौकात दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे यांच्या आदेशान्वये पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस कॉन्स्टेबल असलम शेख, रणजीत मदने ,अमोल बंदूके,राहुल वाघमोडे, नवनाथ चव्हाण यांनी सदर ठिकाणी सरकारी वाहनाने जाऊन राजेंद्र गोरे व रोहित पारसे यांना गराडा घातला. व राजेंद्र गोरे यांच्या हातात एक मोठी लोखंडी मुठ व पाते असले तलवार, तसेच एक लोखंडी मुठ असलेला वाकडा कोयता मिळुन आला व रोहित शंकर पारसे याचे हातात लाकडी मुठ असलेली लोखंडी कुकरी व लोखंडी मुठ असलेला रामपुरी चाकु असे धारधार शस्त्रे सदर इसमांचे हात मिळुन आल्याने ते शस्त्रे पोलीस नाईक राकेश लोहार यांनी जप्त करून वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले.पोलीस कॉन्स्टेबल अमोल ज्ञानेश्वर बंदुके पोलीस अंमलदार नातेपुते पोलीस ठाणे यांचे  फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस  शस्त्र अधिनयिम १९५९ चे कलम ४ व २५ प्रमाणे आरोपी राजेंद्र गोरे व रोहित पारसे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आले सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर अकलुज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक  महारुद्र परजणे, पो.हे.कॉ. बाबर, पो.ना. राकेश लोहार, निलेश बल्लाळ, पो.कॉ. अमोल बंदुके, पो.कॉ, अस्लम शेख,  रणजित मदने, राहुल वाघमोडे यांनी केली.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक राकेश लोहार करीत आहेत.

 चौकटीत :
नातेपुते व परिसरात जर कुणी बेकायदेशीर अग्नि शस्त्र किंवा धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याची तात्काळ माहिती नातेपुते पोलीस ठाणे येथे द्यावी असे आव्हान नातेपुते व परिसरातील नागरिकांना पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

महारुद्र परजणे ( सपोनि नातेपुते पोलीस ठाणे)
Reactions

Post a Comment

0 Comments