साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीची वेळ रात्री बारापर्यंत वाढवुन मिळावी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूर यांच्या वतीने पोलीस आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मंडळांची मिरवणुक दिनांक 3/8/2025 रोजी रविवार असुन त्यादिवशी रात्री १२ वाजेपर्यंत वेळ वाढवण्यात यावी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवापूर्वी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीने सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह ,सर्व शासकीय कार्यालये प्रमुख यांच्या सह शांतता कमिटी बैठक घेण्यात यावी. या मागण्या करण्यात आल्या.शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना मध्यवर्ती समितीच्या सर्व मागण्याना सकारात्मक प्रतिसाद देत, या विषयी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे असे शिष्टमंडळात सांगितले.
याप्रसंगी मध्यवर्तीचे नूतन अध्यक्ष युवा नेते शांतीलाल साबळे, मध्यवर्ती समितीचे माजी अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक सल्लागार सुरेश पाटोळे,लखन गायकवाड,विशाल लोंढे,उपाध्यक्ष विकास डोलारे,सतीश बगाडे,रजनी डोलारे, आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते.
0 Comments