कार्यालय होण्यापूर्वीच रातोरात केले रिक्षा स्टॉपचे अतिक्रमण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जनभावना ध्यानात घेऊन महापालिकेने सिद्धेश्वर मंदिराच्या ईशान्य दिशेकडील प्रवेशद्वारालगतच्या स्वच्छतागृहाचा ठेका रद्द केला. स्वच्छतागृहाची इमारत न पाडता, त्या ठिकाणी आरोग्य निरीक्षकांसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यालय उभारण्याचे काम गतीने सुरू झाले. दरम्यान, या कार्यालयालाच अडथळा ठरेल अशा रीतीने रातोरात रिक्षा स्टॉपचा फलक रोवून अतिक्रमण केल्याचे सोमवारी निदर्शनास आले आहे.
स्वच्छतागृहाची इमारत कायम ठेवून अंतर्गत भिंती पाडून, नवीन फरशा, भिंतीची रंगरंगोटी असे सुशोभीकरण नगअभियंता कार्यालयाकडून करण्यात येत आहे. आरोग्य निरीक्षकांना बसण्यासाठी कार्यालयाची रंगरंगोटी सुरू आहे. इतर कामेदेखील गतिमान पद्धतीने सुरू आहेत. अशावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य, प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद, लक्ष्मी मार्केट रिक्षा स्टॉप, सिद्धेश्वर पेठ असे लिहिलेला भला मोठा फलक अतिक्रमण करून लावण्यात आला आहे.
स्वच्छतागृहाच्या इमारतीमध्ये आरोग्य निरीक्षकांसाठी कार्यालय उभारण्याचे काम नगरअभियंता कार्यालयाकडून सुरू आहे. या इमारतीचे सुशोभीकरण केले जात आहे. या कार्यालयासमोर रिक्षा स्टॉपचे फलकाचे अतिक्रमण करण्यात आले आहे. ते हटविण्याबाबत अतिक्रमण विभागाला आदेश दिले आहेत.
0 Comments