इनरव्हील क्लबच्या टेंभुर्णी अध्यक्षपदी कोकाटे तर सचिवपदी बोबडे यांची निवड
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- इनरव्हील क्लबज्ञ टेभुर्णीच्या २०२५ -२०२६ यावर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. यामध्ये सविता कोकाटे यांची अध्यक्षपदी , स्वरूपा बोबडे यांची सचिवपदी तर खजिनदार म्हणून स्मिता गांधी यांची निवड करण्यात आली.
याचवेळी वैष्णवी कुलकर्णी(उपाध्यक्ष), तनुजा शहा( आएसओ), स्वाती ताबे( एडिटर), रेणुका भणगे( सीसी), या पदभार नियुक्ती करण्यात आली.
सोलापूर येथील स्टारलेट क्लबच्या ( आय एस ओ) स्मिता चाकोटे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या चाकोटे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच टेंभुर्णी सरपंच सौ. सुरजा बोबडे यांनी वृक्ष लागवड व प्लास्टिक मुक्त टेंभुर्णी करण्यासाठी महिलांनी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
क्लबच्या मावळत्या अध्यक्षा स्वराली बोबडे यांनी गतवर्षीचे कार्य थोडक्यात सांगितले व कॉलर ,पिन आणि चार्टर देऊन नूतन अध्यक्षा सविता कोकाटे यांच्याकडे पदभार सोपवला. नूतन अध्यक्षा सविता कोकाटे यांनी सर्व उपस्थित क्लबच्या सदस्या व महिलांना फळांची व गुलाबाची रोपे देऊन सन्मान केला व मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ती जगवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका भणगे व रुपाली येवले यांनी केले . सर्व उपस्थितांचे आभारतर आवैष्णवी कुलकर्णी यांनी मानले.
0 Comments