Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथे जनसेवा संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

 अकलूज येथे जनसेवा संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न




अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्यात,कर्तुत्ववान कार्याचा प्रचंड मोठा ठसा उमटवणाऱ्या तर 'जीवात जीवमान असे पर्यंत जनसेवाच करू', या ब्रीद वाक्याचे सार्थक केलेल्या, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर प्रतापगड - अकलूज येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी जनसेवा संघटनेच्या राज्य कार्यकारिणीसह सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आदी जिल्हा, तालुका, जिल्हा परिषद गट व गणनुसार पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या नूतन राज्य कार्यकारिणी सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील, उर्वशीराजे मोहिते पाटील, निहानसिंह मोहिते पाटील, सुधीर लांडे, भीमराव बाळगी, माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे, सतीश पालकर, सुधीर रास्ते, मयूर माने, नवनाथ साठे, पिंटू वैद्य, विकास शिंदे, ज्योती कुंभार यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरा प्रसंगी, ह.भ.प. किशोर जाधव, शाहीर राजेंद्र कांबळे, ह.भ.प.विठ्ठल महाराज फड, ह.भ.प. अशोक महाराज शिंदे, अॅड. आभिषेक कांबळे, विराज खराडे आदींनी अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी राजेश शिंदे यांनी तयार केलेल्या जनसेवा संघटनेच्या डिजीटल ॲपचे उद्घाटन  डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की, राज्यभर जनसेवा संघटनेचे ७० हजार सभासद असून, यापुढे डिजीटल ॲपच्या माध्यमातून सभासद वाढणार आहेत. लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी अनेकांना जिल्हा परिषद सदस्य, आमदार, मंत्री केले. याच इतिहासाची पुनुरावृत्ती भविष्यात जनसेवा संघटनेच्या माध्यमातून होणार आहे. रक्तदान, बंधारे बांधणे असे विविध सामाजिक उपक्रम राबवून जनसेवा संघटनेने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या संघटनेला ५० वर्षे पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments