आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान,वृक्षारोपण व वह्या वाटप
अकलूज (कटूसत्य वृत्त):- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त माळशिरस तालुक्यात अकलूज व सदाशिवानगर येथे भव्य रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
येथील विजय चौकामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. माजी सरपंच, युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, फातिमा पाटावाला, शशिकला भरते, हेमलता चांडोले, सुनीता फुले, पायल मोरे, सतीश व्होरा, राजेंद्र काकडे, राहुल मोरे, राहुल जगताप, मच्छिन्द्र पगारे, दादाभाई तांबोळी, जुल्कर शेख, बाळासाहेब वाईकर, डॉ. संतोष खडतरे, डॉ. अजित गांधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये अतिशय उत्साहाने व उत्स्फूर्तपने सुमारे ४१७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचे काम सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढीने केले.
सदाशिवनगर येथे आ रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भव्य वृक्षारोपण व जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप कार्यक्रम सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते - पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पाढंरे यांच्या हस्ते संपन्न झाला . सदाशिवनगर परिसरात गुलमोहर व भावा या जातीची रोपे लावण्यात आली.
यावेळी श्री शंकर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या संयोगाने कारखाना परिसरातील सदाशिवनगर, पुरदांवडे, येळीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संचालक सुरेश पाटील, महादेव शिंदे, दादासाहेब वाघमोडे पाटील, रामदास कर्णे, रामभाऊ खुळे, मार्केट कमिटीचे संचालक लक्ष्मण पवार, अनंतलाल दोशी, माजी पंचायत सदस्य अभिमान सावंत,बिनु पाटील,नाना शेंडे, बाबासाहेब इंगळे ,धोंडीराम नाळे, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब कदम, माऊली सुळ, विष्णू घाडगे ,अनिकेत पवार, शंकर बर्वे, संजय रोंगेशरद साळुंखे, युवराज देशमुख, सरपंच अतुल सांवत, उपसरपंच शिवराज निंबाळकर, पोपट निंबाळकर, विलास फडतरे, विलास निंबाळकर,लालासाहेब फडतरे, गुलाब रोकडे, अशोक निबांळकर, गुलाब विठ्ठल निंबाळकर, निखिल जाधव, धनु पाटील, सदाशिवनगर चे सरपंच विरकुमार दोशी, उपसरपंच विष्णू भोंगळे ,माजी उपसरपंच उदय धाईजे,प्रशांत दोशी,शेतकरी संघटनेचे दत्ता भोसले, अशोक कांबळे, बडाभाई, तुकाराम चव्हाण, डॉ पालवे, डॉ तन्वीर, ज्ञानेश राऊत, बाबा भुजबल, तानाजी अगतराव पालवे, लालखान पठाण, चंद्रकांत तोरणे, अंकुश डुबल,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष जाधव, राजेंद्र जाधव, राम बनसोडे, अनिल अवघडे,सागर उरवणे, तानाजी रामहारी पालवे, दिलीप पिसे, दिपक राऊत, सचीन राऊत, पुरदांवडे गावचे उपसरपंच देवीदास ढोपे, पोपट गरगडे, संतोष शिंदे, दादा मोहिते, महादेव बोराटे,कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, अभिजीत डुबल, सचीव रविराज जगताप, अधिकारी, कर्मचारी, सदाशिवनगर, पुरंदावडे, येळीव, गावचे ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments