पोलीस प्रशासनाकडून पालखी सोहळ्यातील गर्दीवर व वाहतुकीवर नियंत्रण
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जून रोजी सोलापूर जिल्हा सरहद्द धर्मपुरी येथे आगमन झाला होता पालखी सोहळ्यातील पहिला मुक्कामाचा टप्पा नातेपुते शहरात होता त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे येथे पालखी सोहळ्यासाठी १६ पोलीस कर्मचारी ४०० होमगार्ड १०५० पोलीस कर्मचारी १५० पोलीस अधिकारी असा बंदोबस्त मागवण्यात आला होता. नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी पोलीस अध्यक्ष क अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अध्यक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्यातील गर्दीवर योग्य नियोजन केले होते. धर्मपुरी सरहद्दीपासून ते धर्मपुरी विसावा पानसकर वस्ती शिखर शिंगणापूर चौक विसावा व नातेपुते मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी लावून दोरखंड व बॅरिकेटिंग च्या साह्याने गर्दीवर नियंत्रण मिळवले होते तसेच पालखी सोहळ्यातील संस्थांची मोठी वाहने तसेच दिंडीतील वाहने मुक्कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचावी यासाठी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पहाटे तीन वाजल्यापासून ठिकठिकाणी चौकातून पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करून वाहने जलद गतीने मुक्कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचवली नातेपुते मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीच्या आरती वेळेस महिलांची व पुरुषांची मोठी गर्दी झाली होती.तसेच त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी व नातेपुते पोलीस यांनी गर्दीत संशयित असणाऱ्या अनेकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई केली.महारुद्र परजणे यांनी पोलीस कर्मचारी घेऊन त्या ठिकाणी गर्दी नियंत्रण येण्यासाठी वारकरी व भाविकांना आवाहन करून उपायोजना केल्या. धर्मपुरी ते नातेपुते व मांडवे हद्दीपर्यंत विना अपघात सुरक्षित अशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा माळशिरस मुक्कामी मार्गस्थ झाला. पोलीस प्रशासनाकडून योग्य नियोजन झाल्याने पालखी सोहळा प्रमुखाकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात आले.
सोलापूर पोलीस प्रशासनाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील बंदोबस्ताचे काम चौरव ठेवले होते. पालखी सोहळ्यातील गर्दीवर नियंत्रण ठेवून वाहनांवरती नियंत्रण ठेवले होते कुठेही कोणता अडथळा निर्माण झाला नाही दिंडीतील वाहनांना मुक्कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचावे लागते व त्या ठिकाणी जाऊन जेवण बनवावे लागते ह्या सर्व गोष्टी वेळेवर झाल्याने दिंडीतील लोकांना आराम करण्यास वेळ मिळतो सोलापूर पोलीस प्रशासनाने अतिशय उत्तम काम केले आहे.
योगी निरंजननाथ
पालखी सोहळा प्रमुख
0 Comments